Tarun Bharat

चतुर्थशेणी कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन

Advertisements

प्रतिनिधी / सातारा
चुतर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून जिल्हा शल्यचिकित्सक खोटी आश्वासने देवून संघटनेची दिशाभूल करत आहे. या मागण्या मान्य करण्यासाठी सोमवारपासून राज्य सरकारी गट ड (चतुर्थ शेणी) कर्मचारी संघटनेच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

चतुर्थश्रेणी संवंर्गातील काही कर्मचार्‍यांचे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चित करून फरकासह वेतन मिळाले नाही, रिक्तपदे तात्काळ भरण्यात आली नाहीत. चतुर्थशेणी संवर्गातील पदोन्नत्या तात्काळ मिळाव्यात, अनुकंपा भरती तात्काळ करण्यात यावी, चतुर्थश्रेणी संवर्गातून लिपीक पदावरील पदोन्नतीचा प्रस्ताव मा. उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ, पुणे यांच्याकडे पाठविण्यात यावे, या व इतर मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे सतत पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. तसेच आदोलन केली आहेत. ही आंदोलने जिल्हा शल्य चिकित्सक यांचा आश्वासनाचा आदर राखून वेळोवेळी स्थगित केली आहेत. परंतु प्रशासनाने या मागण्यांचा विचार गांभीर्याने केला नाही. यामुळे संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमदुत धरणे आंदोलन करत असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेखा चव्हाण, कार्याध्यक्ष विष्णू नलावडे, चंद्रकांत जाधव, प्रकाश घाडगे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

सातारा : प्राथमिक शिक्षिकेचा आत्महत्येचा प्रयत्न

datta jadhav

सातारा : शिवसेनेची भाजपाविरोधात निदर्शने

datta jadhav

बनावट कागदपत्राद्वारे 13 कोटींची फसवणूक

Patil_p

अभेपुरीत ‘त्या’ वृद्धेचा मृतदेह आढळला विहिरीत

Abhijeet Shinde

सातारा : टकले ग्रामपंचायतीच्यावतीने सेवानिवृत व्यक्तींचा गौरवसोहळा

Abhijeet Shinde

सातारा : अतुल कुलकर्णी, अमित तांबे यांना रंगकर्मींकडून श्रध्दांजली

datta jadhav
error: Content is protected !!