Tarun Bharat

चन्नम्मा चौकात राज्योत्सव साजरा करण्याचा आटापिटा

राज्योत्सव साजरा करून भपकेपणा दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न : मूठभर कार्यकर्त्यांमुळे नागरिकांना त्रास

प्रतिनिधी /बेळगाव

अस्मिता काय असते आणि संस्कृती काय असते ते मराठी भाषिकांकडूनच शिकले पाहिजे. आम्ही कुठल्या भाषिकांचा व्देष करत नाही. मात्र भाषेच्या नावावर बेळगावमध्ये जो धिंगाणा सुरू आहे तो केवळ काही मोजक्मया व्यक्तींच्या अट्टहासापायी सुरू आहे. मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी परजिह्यातून कन्नड भाषिक आणून या ठिकाणी राज्योत्सव साजरा करण्याचा प्रयत्न दरवषीच सुरू असतो. यावषी देखील राज्योत्सव साजरा करण्याचा प्रयत्न सुरू असताना अखेरच्यावेळी अत्यंत साध्या पद्धतीने राज्योत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले. मात्र साध्या पद्धतीने साजरा करताना कुणालाच भान नसल्याचे पुन्हा एकदा दिसून
आले.

शिस्त, शांतता आणि संयम राखणे महत्त्वाचे असते. केवळ दुसऱया भाषिकांना दुजाभाव देण्यासाठी कोणताही उत्सव किंवा जल्लोष करणे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेळगाव हे मराठी भाषिक लोकांचेच शहर आहे. यात वादच नाही.

काही मोजकीच मंडळी राज्योत्सव साजरा करण्यासाठी आटापिटा करत असतात. सोमवारीही कित्तूर चन्नम्मा चौक येथे हातात लाल-पिवळय़ा रंगाचा झेंडा घेऊन तो साजरा करण्याचा प्रयत्न झाला. मात्र यामुळे ऐन दिवाळीच्या सणाच्यावेळी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला.

राज्योत्सव साजरा करून भपकेपणा दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने आणि काही मूठभर संघटनांनी सोमवारी दाखवून दिला. जबरदस्तीचा हा राज्योत्सव असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

कित्तूर चन्नम्मा चौक तसेच इतर ठिकाणी काही मुठभर कन्नड संघटनांचे पदाधिकारी जोरदार घोषणाबाजी करून राज्योत्सव साजरा करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे पहायला मिळाले.

कर्नाटकची बाजू लंगडी असल्याचे वारंवार उघडकीस

सीमाप्रश्नाचा खटला हा अंतिम टप्प्यात आहे. सर्वोच्च न्यायालयात या खटल्यामध्ये महाराष्ट्राची बाजू बळकट आहे. तर कर्नाटकची बाजू लंगडी असल्याचे वारंवार उघडकीस येऊ लागले आहे. यामुळे किमान या ठिकाणी आम्ही राज्योत्सव मिरवणूक काढुन बेळगाव आपले आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न दरवषी केला जातो. मात्र यावषी मिरवणुकीला बगल देत केवळ चौकामध्ये राज्योत्सव साजरा करण्यात आला.

Related Stories

समन्वयक मंत्र्यांच्या दौऱयामुळे म. ए.समिती कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

Amit Kulkarni

मंडोळी येथील नवदांपत्याकडून 32 मन सुवर्ण सिंहासनाला देणगी

Amit Kulkarni

दुसऱयांदा वाढविलेली कॅन्टोन्मेंटची मुदत फेब्रुवारीमध्ये संपणार

Patil_p

म.ए.समितीचे कोविड विलगीकरण केंद्र आजपासून सेवेत

Amit Kulkarni

भीषण अपघातात मुख्याध्यापकासह शिक्षक ठार

Patil_p

पूरपरिस्थितीत मदतीसाठी आता यंत्र बोटी

Patil_p
error: Content is protected !!