Tarun Bharat

चन्नम्मा सर्कल येथे कारला आग

सोमवारी सकाळी घडली घटना :  कारचे किरकोळ नुकसान

प्रतिनिधी /बेळगाव

चन्नम्मा सर्कल येथे कारला आग लागण्याची घटना सोमवारी सकाळी घडली. अचानक कारमधून धूर निघाल्याने चालक बाहेर पडला. आग लागल्याची घटना अग्निशमन विभागाला कळताच घटनास्थळी दाखल होत आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेळेत आग विझविण्यात आल्याने कारचे किरकोळ नुकसान झाले.

सकाळी 9.30 च्या सुमारास (के. ए. 20 पी 0344) या कारच्या दर्शनी भागातून धूर येण्यास सुरुवात झाली. चालकाने तात्काळ कार रस्त्याच्या बाजूला घेतली. धुराचे प्रमाण वाढत गेल्यामुळे स्थानिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. बॅटरीजवळ शॉर्टसर्किट झाल्याने आग लागण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. अग्निशमन विभागाने आग आटोक्मयात आणली.

Related Stories

मनपा महसुल विभागातील कर्मचाऱयाला कोरोनाची लागन

Patil_p

सीबीटी-विमानतळ बससेवेकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

मुलांचे आरोग्य पणाला लावू नका!

Patil_p

बागलकोट जिल्हय़ात 8 जणांना कोरोना बाधा

Patil_p

बीडीके हुबळी, जॅनो पँथर्स गदग, हुबळी क्रिकेट अकादमी संघ विजयी

Amit Kulkarni

बेळगाव विमानतळासाठी जागा हस्तांतर करा

Amit Kulkarni