Tarun Bharat

चन्नीच काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ; १० फेब्रुवारीपूर्वी होणार नावाची घोषणा

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पंजाब विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेला काँग्रेसमधील वाद आता संपणार आहे. काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्रीपदासाठी नाव निश्चित केले आहे. सध्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी हेच निवडणुकीत काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील. १० फेब्रुवारीपूर्वी त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. निवडणुकीत कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी काँग्रेस हे पाऊल उचलणार आहे, असे मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात येत आहे. हायकमांडने चन्नी यांच्या १०० दिवसांच्या कामाचा आधार घेतला आहे. चन्नी यांच्या कामाने काँग्रेसची स्थिती सुधारली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींसारख्या प्रचंड राजकीय गोंधळातही चन्नी यांनी त्यांच्या नेतृत्व क्षमतेने प्रभावित केले आहे. गेल्या निवडणुकीवेळी २०१७ मध्ये मतदानाच्या १० दिवस आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाची घोषणा राहुल गांधींनी केली होती. आतापर्यंत आलेल्या सर्व्हेमध्ये काँग्रेस सत्तेच्या शर्यतीत पुढे असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेल्या १०९ उमेदवारांचा मोठा दबाव हायकमांडवर आहे.

Related Stories

सोलापूर शहरात 47 कोरोना पॉझिटीव्ह तर 4 जणांचा मृत्यू

Archana Banage

तृणमूलच्या हिंसाचारापासून वाचण्यासाठी 400 कार्यकर्ते आसाममध्ये

datta jadhav

दहावी परीक्षेचा निकाल लांबणीवर

Archana Banage

पाकव्याप्त काश्मीरमध्ये मतदानादरम्यान हिंसा

Patil_p

…तर हे पाऊल भारताला चुकीच्या वळणावर नेणार – अमेरिका

Abhijeet Khandekar

‘माणूस जेव्हा नशिबालाच…’, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचं सूचक ट्विट

Archana Banage