Tarun Bharat

चमिंडा वासचा राजीनामा मागे

Advertisements

वृत्तसंस्था/ कोलंबो

लंकन क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपद चमिंडा वासकडेच यापुढे राहील, अशी माहिती लंकन क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. गेल्या महिन्यात वासने आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लंकन क्रिकेट मंडळाने दोन्ही गटाच्या सदस्यांमध्ये बैठक घेवून या प्रकरणावर सामोपचाराने तोडगा काढला. आता यापुढे लंकन क्रिकेट संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी चमिंडा वास राहील, असे सांगण्यात आले.

चालू वर्षांच्या प्रारंभी लंकन संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदाची जागा डेव्हिड सॅकेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खाली झाली होती. त्यानंतर लंकन क्रिकेट मंडळाने वास वेगवान गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. लंकेच्या विंडीज दौऱयासाठी वासची नेमणूक करण्यात आली होती. पण, तीनच दिवसात वासने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मानधन संदर्भातील वास आणि लंकन क्रिकेट मंडळ यांच्यात मतभेद झाले होते. दरम्यान या समस्येवर लंकन क्रिकेट मंडळाने यशस्वी तोडगा काढल्याने आता वासकडे यापुढे गोलंदाज प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहील, असे मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. अलीकडे भारतामध्ये झालेल्या रोड सेफ्टी विश्व टी-20 लिजेंड्स स्पर्धेत वासने लंकन संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.

Related Stories

जर्मनीची पेटकोव्हिक विजेती

Patil_p

मुंबई इंडियन्सला रोखण्याचे राजस्थानसमोर आव्हान

Patil_p

भारतीय संघाला दंड

Patil_p

भारत अ संघाचे नेतृत्व संजू सॅमसनकडे

Patil_p

ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या क्वारंटाईनमधील 9 जणांना कोरोनाची बाधा

Patil_p

बेंगळूर टेनिस स्पर्धेत पेसचा सहभाग

Patil_p
error: Content is protected !!