Tarun Bharat

चर्चिल, शेक्सपियर अन् 1940 ची ‘हार’

युक्रेन अध्यक्षांच्या भाषणावर ब्रिटिश खासदार मुग्ध : उभे राहून दिली मानवंदना

“आम्ही हार मानणार नाही आणि हरणार देखील नाही. आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत लढू, समुद्रात, आकाशात…आमही आमच्या भूमीसाठी लढत राहू. किंमत काहीही असो…आम्ही जंगलांमध्ये, शेतांमध्ये, किनाऱयांवर आणि रस्त्यांवर लढू’’. ब्रिटनचे पंतप्रधन विन्स्टन चर्चिल यांनी कनिष्ठ सभागृह ‘हाउस ऑफ कॉमन्स’मध्ये दुसऱया महायुद्धादरम्यान 1940 मध्ये ब्रिटिश सैन्याला जर्मनीच्या हल्ल्यामुळे फ्रान्समधून माघार घ्यावी लागल्यावर हे म्हटले हेते. चर्चिल यांच्या या भाषणानंतर जे घडले तो इतिहास आहे.

आता युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर जेलेंस्की यांनी चर्चिल यांच्या भाषणातील या ओळींचा उच्चार करत ब्रिटनच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत लढू, हार मानणार नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक भाषणानंतर पूर्ण सभागृहात टाळय़ांच्या कडकडाट झाला. ब्रिटिश खासदार युक्रेनच्या अध्यक्षाला उभे राहून मानवंदना देताना दिसून आले.

आम्ही पाश्चिमात्य देशांच्या सहाय्यासाठी तुमची मदत इच्छितो. आम्ही या मदतीसाठी आभारी आहोत. कृपया रशियाच्या विरोधातील निर्बंध वाढवा, त्याला एक दहशतवादी देश घोषित करा. युक्रेनचे आकाश सुरक्षित रहावे हे सुनिश्चित करा असे जेलेंस्की यांनी ब्रिटनच्या संसदेला उद्देशून म्हटले आहे.

तसेच त्यांनी प्रसिद्ध साहित्यिक विलियम शेक्सपियर यांच्या काही ओळींना स्वतःच्या भाषणात स्थान दिले. सैन्याचा गणवेश परिधान केलेल्या जेलेंस्की यांनी शेक्सपियर यांच्या ओळींचा उल्लेख करत ‘आमच्यासाठी (युक्रेन) प्रश्न हा आहे की असणे की नसणे… मी तुम्हाला एक निश्चित उत्तर देऊ शकतो होय असणे आहे’ असे म्हटले आहे.

Related Stories

पाकिस्तानमध्ये मागील चोवीस तासात 1356 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 57 हजार पार

Tousif Mujawar

नवा समुद्र अस्तित्वात येणार

Patil_p

अफगाणिस्तान : फैजाबादमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

चीनमधील लँड ऑफ वॉटर

Patil_p

लंडनमध्ये टाळेबंदी

Patil_p

आधी गोळय़ा घालायच्या, मग मृतदेहासाठी पैसे उकळायचे

Patil_p