Tarun Bharat

चर्मकार युवक मंडळातर्फे संत रोहिदास जयंती साजरी

प्रतिनिधी /बेळगाव

पाटील गल्ली, खासबाग येथील श्री संत रोहिदास चर्मकार युवक मंडळाच्यावतीने शुक्रवारी संत रोहिदास जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी श्री संत रोहिदास यांच्या फोटोचे पूजन हभप लव महाराज नार्वेकर यांच्या हस्ते तर मच्छिंद्र नागाप्पा कांबळे यांच्या हस्ते फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

दीपप्रज्वलन सेपेटरी शंकर शिंदे, शंकर नार्वेकर, सुरेश कांबळे यांच्या हस्ते झाले. सायंकाळी पाटील गल्ली येथील वारकरी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व भाविकांना तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी हभप लक्ष्मण बनार, कुश व राजाराम नार्वेकर, बाळू पाटील, बाळकृष्ण नार्वेकर, चंद्रकांत बेळगावकर, राजू कांबळे, शिवपूत्र सांगली, नंदकुमार शिगणापूर, वैजनाथ उचूकर तसेच गल्लीतील महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.

Related Stories

टायपिस्टच्या कन्येची युपीएससी-सीएमएस परीक्षेत गरुडझेप

Patil_p

पहिले रेल्वेगेटवरील बॅरिकेड्स हटवा

Amit Kulkarni

शहर परिसरातील खुल्या जागा-मैदाने बनली गैरधंद्यांचे माहेर घर

Amit Kulkarni

सदलगा येथे पंजाभेटी, पीर मिरवणूक रद्द

Amit Kulkarni

मच्छे-पिरनवाडीतील कचरा समस्या सुटणार कधी?

Amit Kulkarni

रेल्वे तिकीट काऊंटर काही तासच सुरू

Amit Kulkarni