Tarun Bharat

चलनातील घसरणीला तोंड देण्यास भारतीय कंपन्या सक्षम

जागतिक पतमानांकन संस्था मूडीजचा भारतीय कंपन्यांसाठीचा अंदाज व्यक्त

नवी दिल्ली

  भारतातील बहुतेक कंपन्या चलनमूल्यातील घसरणीला तोंड सक्षम  आहेत, परंतु विकसित अर्थव्यवस्थांमध्ये वाढणारे व्याजदर आणि उर्जेच्या किमती यामुळे रुपया अस्थिर राहू शकतो, असा अंदाज मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने व्यक्त केला आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून रुपयाचे सुमारे 10 टक्क्यांनी अवमूल्यन झाल्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी भारतीय चलन प्रति डॉलर 81.67 वर पोहोचले, असे मूडीजने म्हटले आहे.

 विकसित अर्थव्यवस्थांमधील व्याजदरात सातत्याने होणारी वाढ आणि उर्जेच्या वाढत्या किमती यामुळे चालू खात्यातील तूट वाढली असून रुपयावर दबाव निर्माण झाला आहे. हे बाह्य घटक रुपयाच्या अस्थिरतेत भर घालतात, परंतु भारतातील बहुतेक कंपन्यांकडे रुपयाच्या घसरणीला सामोरे जाण्यासाठीची क्षमता आहे, असेही मूडीजने स्पष्ट केले आहे.

‘त्या’ कंपन्यांवर परिणाम होईल?

कमकुवत होणाऱया रुपयाचा त्या कंपन्यांवर जास्त परिणाम होईल ज्यांच्या किंमती डॉलरमध्ये आहेत आणि महसूल निर्मिती रुपयांमध्ये आहे.

Related Stories

एलईडी दिवे, एसी उत्पादनासाठी सरकार देणार प्रोत्साहन

Patil_p

फ्लिपकार्टची पेटीएमबरोबर भागीदारी

Omkar B

देशावर येणार पुन्हा वीज संकट; कसे ते पाहूया

Kalyani Amanagi

महिंद्राच्या सीईओपदी आशिष शहा

Patil_p

अमेरिका-चीन तणावाने सेन्सेक्स कोसळला

Patil_p

पहिल्या सहामाहीत सोने आयातीत घट

Patil_p