सध्या सोशल मीडियावर चीनमधील डॉक्टर ली वेनलियांग यांचा दाखला देत एक कोरोनासंबंधी पोस्ट व्हायरल केली जात आहे.
ङयामध्ये असे सांगण्यात आले आहे की, दररोज तीन कप चहा प्यायल्यामुळे कोरोनापासून केवळ बचावच होतो असे नाही तर संक्रमण झालेली व्यक्ती काही दिवसांत कोरोनामुक्तही होते.
ङ यामध्ये असेही म्हटले गेले आहे की, कोरोनापासून बचावासाठी मेथिलॉक्थिन, थियोब्रोमिन आणि थियोफालीनची गरज असते. या घटकांमुळे कोरोनाचे विषाणू मरतात. चहामध्ये हे तीनही घटक असतात.
ङतथापि, ही पोस्ट पूर्णतः चुकीची आणि अशास्रीय आहे. मुळातच डॉ. वेनलियांग यांचा मृत्यू कोरोनामुळेच फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये झाला आहे. तसेच ते नेत्रतज्ञ होते. त्यांचा कोरोनावरील उपचारांशी कसलाच संबंध नव्हता.
ङदुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चहामध्ये अँटीऑक्सिडंट, फायटोकेमिकल्स असतात. त्यामुळे इम्युनिटी वाढते, एजिंगचे परिणाम कमी होतात; आले टाकून केलेला किंवा मसाला चहा गुणकारी असतो. लेमन टी घेतल्याने शरीर डिटॉक्स होते. परंतु विषाणू मारण्याची क्षमता चहामध्ये नसते. तसेच उपरोक्त तीनही घटक चहामध्ये नसतात.
किंबहुना, तीनहून अधिक कप चहा प्यायल्यास अनिद्रा, अपचन, गॅसेस, ऍसिडीटी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या फेक पोस्टचा जराही विचार करु नका.