Tarun Bharat

चांगल्या आरोग्यासाठी आयुर्वेदा सर्वांनी पारखून पहावे- श्रीपाद नाईक

Advertisements

म्हापशात दिनेश वाघेला यांच्या पतंजली आस्थापनाचे उद्घाटन

प्रतिनिधी /म्हापसा

दिनेश वाघेला यांच्या माध्यमातून म्हापशात हे दुसरे पतंजली आस्थापन खुले होत आहे. म्हापसा वासियांना हे आवश्यक आहे. पतंजलीची ही दुकाने गोव्यातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध झालेली आहे. चांगली व आयुर्वेदिक औषधे मिळण्याचे पतंजली केंद्र आहे. आम्हाला स्वाभिमान आहे की, रामदेव बाबानी हजारो कोटीची उलाढाल पतंजलीच्या आस्थापनातून केली आहे. याचा फायदा जनतेला होणार आहे. लोकांनी आयुर्वेदाचा फायदा करून घ्यावा व औषधाचा लाभ घ्यावा. नैसर्गिक औषधांचा फायदा पुरेपूर कोविड काळात झाला. आयुर्वेदा आज चांगल्यारित्या चालतो. आमचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आयुर्वेदा सर्वांनी पारखून पहावा अशी माहिती केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.

म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिरासमोर नव्यानेच दिनेश वाघेला यांच्या पतंजली आस्थापनाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते समई दीप प्रज्वलित करून उद्घाटन केल्यावर नाईक बोलत होते. यावेळी माजी कायदे मंत्री ऍड. दयानंद नार्वेकर, सौ. सुषमा नार्वेकर, अमिता सलत्री, प्रदीप जोशी, मंगलदास नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

आयुर्वेदिक इस्पितळ येत्या 6 महिन्यात लोकार्पण

राज्यात जे आयुष मंत्रालयाचा देखभालीखाली आयुर्वेदिक इस्पितळ येणार आहे त्यांचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या 6 महिन्याच्या कालावधीत ते पूर्णत्वाकडे येईल. ऑगस्टपर्यंत इस्पितळ सुरू करण्याकडे सरकारचा कल असल्याची म]िहती श्रीपाद भाऊंनी दिली. धारगळच्या पठारावर विमानतळाच्या मार्गावर इस्पितळाचे कंत्राटचे काम पूर्ण झाले आहे. ओपीडी प्रथम सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर यंदापासून कॉलेजच्या प्रवेशासाठी पुढच्या वर्षासाठी यंदापासून प्रवेश घेण्यास सुरुवात करण्यात येईल. पदवी व पोस्ट-ग्रेज्युएशन, वनस्पती या सर्वांचा संवर्धन करण्याकडे यामध्यमातून लक्ष दिले जाईल असे ते म्हणाले. याचा फायदा गोमंतकीयांना मोठय़ा प्रमाणात होईल अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, गोवा मोठे आहे त्यात आयुर्वेदिक हॉस्पिटल आज अनेक पर्यटक येतात त्याचा फायदा पर्यटकांना होणार. वर्ग येथे शकविण्यात येईल. योगा इन पदवी हे वर्ग घेण्यात येईल. राज्यात डॉक्टरही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचा फायदा नोकरभरती आदींना होणार आहे. अशी माहिती यावेळी केंद्रीय पर्यटन मंत्री श्री. नाईक यांनी दिली.

सर्वांच्या सोयीसाठी म्हापशात आस्थापन- वाघेला

यावेळी बोलताना आस्थापनाचे मालक दिनेश वाघेला यांना सर्वांचे आभार मानले. सर्वांच्या आशीर्वादाने म्हापसा वासियांच्या व बार्देश वासियांसाठी म्हापशात हे नवीन आस्थापन सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

जनतेने राज्यात भाजपला कौल दिले- श्रीपाद नाईक

जनतेने भाजपला यापूर्वीच विजयाचा कौल दिलेला आहे. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. आणि राज्यात भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीत सरकार स्थापन करणारच यात शंकाच नाही. अशी माहिती केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जनता पूर्णतः भाजपबरोबर राहिल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

गणेशोत्सव नियमावली प्रचंड टीकेनंतर मागे

Amit Kulkarni

फोंडय़ातील भाजपा उमेदवारीवर संदीप खांडेपारकर ठाम

Amit Kulkarni

मोरजी, मांद्रे किनारी भागातील कर्णकश आवाजाने नागरिक त्रस्त

Patil_p

वास्को बायणातील तो धार्मिक कट्टा अखेर हटवला

Amit Kulkarni

चंद्रकात कवळेकर यांनी केपे मतदार संघातून दाखल केला अर्ज

Sumit Tambekar

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाची ओपीडी सोमवारपासून सुरू करणार

Patil_p
error: Content is protected !!