बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे माजी सचिव निवृत्त मुख्याध्यापक कै. के. बी. निलजकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव प्रसाद मजुकर यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. कै. के. बी. निलजकर यांनी प्रामाणिकपणे आणि नि÷sने 26 वर्षे सेवा बजावली. ही संस्था उभारण्यामध्ये त्यांचे फार मोठे योगदान आहे. या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे कार्य ही संस्था कधीच विसरणार नाही, असे सांगून त्यांना प्रसाद मजुकर यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुख्याध्यापक ए. एम. पाटील, सहशिक्षक बी. एम. पाखरे यांनीही श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाला प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आर. बी. राऊत, सहशिक्षक के. एस. कंग्राळकर, एस. एल. सुतार, वाय. बी. कंग्राळकर, शारीरिक शिक्षक एम. एम. डोंबले, कला शिक्षक व्ही. पी. जीवाई, रेणू कदम, नंदा मुचंडी, सारिका पाटील, अंबिका पाटील, अंकिता पाटील, संजीवनी बेडरे, वीणा कुंडेकर यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


previous post