Tarun Bharat

चांदी कामगाराने दहा लाखाचा मारला डल्ला

वार्ताहर / हुपरी

हुपरी येथील एका चांदी उद्योजकाचा विश्वास घात करून घरात मंगलकार्य असल्याने कोणी नसल्याचा फायदा घेत मौल्यवान वस्तू व रक्कम ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या स्ट्राँग रूममधून दहा लाख रुपयांवर डल्ला मारून कामगार पलायन झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत महेश अनिल पाटील यांनी कामगार जनार्दन नामदेव सुतार(रा. हुपरी) याच्या विरोधात हुपरी पोलीस ठाण्यात फिर्याद  नोंद केली आहे.

दरम्यान विश्वासावर चालणाऱ्या चांदी व्यवसायावर गदा येण्याची शक्यता चांदी व्यावसायिकातून वर्तवली जात आहे. हुपरी (ता. हातकणंगले) येथील शहराच्या मध्यवर्ती भागात महेश अनिल पाटील (वय31) या चांदी व्यावसायिकाचे महेश ऑर्नामेंट नावाचे चांदी दागिन्यांचे दुकान आहे. चांदी दुकानात चांदीच्या वस्तू आणण्यासाठी व नेण्यासाठी  व इतर कामासाठी  विश्वासू  कामगार म्हणून जनार्दन नामदेव सुतार हे कामाला होते. त्याला दुकानातील सर्वकाही माहीत होते.

चांदी व्यावसायिक महेश अनिल पाटील यांच्या घरी मंगलकार्य असल्याने आठ ते दहा दिवस त्यांच्या घरातील सर्वजण मंगलकार्यात गुंतले होते. याच संधीचा फायदा कामगार जनार्दन सुतार यांनी उचलला असल्याचे सांगितले. जनार्दन सुतार याची आई अनेक वर्षांपासून चांदी व्यावसायिक महेश पाटील यांच्या घरात काम करीत आहे.विश्वासाला पात्र असणाऱ्या जनार्दनने धोका दिला.

जनार्दन या कामगाराला घरातील सर्व ठिकाणे माहीत होते.चांदीच्या दुकानातील स्ट्राँग रूममध्ये दागिने, मौल्यवान वस्तू तसेच रोख रक्कम ठेवण्यात येते. त्या स्ट्राँग रूममध्ये500 रुपयांच्या नोटांचे अडीच लाखांचे एक बंडल  असे चार बंडल पॅक करून ठेवले होते.याची संपूर्ण माहिती संशयित आरोपी जनार्दन नामदेव सुतार याला होती. दुकान मालकाचा विश्वास संपादन करून पिशवीत पॅक केलेली दहा लाख रुपयांची रक्कम सुतार यांनी चोरून नेल्याची फिर्याद महेश पाटील यांनी दिली आहे. त्यानंतर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जनार्दन नामदेव सुतार हा चांदी व्यावसायिकाच्या घराजवळ रहात असून सध्या तो फरारी झाला आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक सज्ज झाले असून शोध मोहीम गतिमान झाली आहे.

Related Stories

राशिवडे येथे एकाच कुटुंबातील सात सदस्य कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

दोघा दुचाकी चोरट्यांना अटक, चोरीच्या दोन किंमती दुचाकी जप्त

Archana Banage

वेळे गाव हद्दीत सोळशी घाटात वाळूच्या डंपरने दुचाकी स्वारास उडवले

Archana Banage

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे 730 नवे रुग्ण, 19 जणांचा मृत्यू

Archana Banage

केअर सेंटरमधील कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर संधी द्या

Archana Banage

खर्चाचा हिशोब सादर न केलेल्या ७५ उमेदवारांना निवडणूक लढवण्यास प्रतिबंद

Archana Banage