Tarun Bharat

चांदी दरात 5500 रूपयांची घसरण

प्रतिनिधी / कोल्हापूर

सप्टेंबर महीन्यात सोने-चांदी दरामध्ये घसरण सुरू आहे. कोणताही सण वा विवाह कार्यकमही नसल्याने, दरात घसरण सुरू आहे. अवघ्या दोन आठवडयात चांदीचा किलोचा दर 5500 रूपयांनी घसरला आहे. गणेश चतुथीं काळात कोल्हापूर सराफ बाजारात सुमारे पाच कोटी रूपयाची चांदी दागिन्यांची उलाढाल होत असे. पण सणावर निर्बंध असल्याने, चांदी विक्रीवरही परिणाम झाला असल्याचे सराफ व्यावसायिकाकडून सांगण्यात आले.

सप्टेंबर महीन्याच्या 7 तारखेला चांदीचा उच्चांकी असा 66 हजार रूपये असा दर होता. शनिवारी आठवडी सुट्टी तर रविवारी अनंत चतुर्थी असल्याने, सराफ बाजार बंद होता. बाजार बंद होण्यापूर्वी शुक्रवारी (17) चांदीचा दर किलोमागे 2600 रूपयांनी उतरला. दोन आठवण्यापूर्वीच्या 66 हजारावरून 63400 रूपये इतका झाला. तर शुक्रवार ते सोमवार (दोन दिवस सुट्टी) या काळात चांदी पुन्हा एकदा 2900 रूपयांनी उतरली. अवघ्या दोन आठवडयात चांदी 5500 रूपयांनी स्वस्त झाली आहे. सोमवारी चांदीचा दर 60500 रूपये इतकी होती. तर दोन दिवसात सोने 48 हजार वरून 47700 रूपये झाल्Îाने, 10 ग्रॅममागे 300 रूपयांनी सोने स्वस्त झाले आहे.

Related Stories

बारावी पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे

datta jadhav

आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना मातृशोक

Archana Banage

तिसंगीत रानभाजी महोत्सवाचे उदघाटन

Archana Banage

बलात्कार प्रकरण : बिहार न्यायालयाने आरोपीला २४ तासांत दिली जन्मठेपेची शिक्षा

Abhijeet Khandekar

महाबळेश्वर पालिका विरोधकांची प्रेस

Patil_p

‘ते’ राज्यपालांचे वैयक्तिक मत; मुख्यमंत्र्यांची सावध भूमिका

datta jadhav