Tarun Bharat

चांदेल – हसापूर पंचायतीचे सरपंच संतोष मळीक यांचा सरपंचपदाचा राजीनामा

प्रतिनिधी /पेडणे 

चांदेल – हसापूर पंचायतीचे सरपंच संतोष मळीक यांनी सरपंचपदाचा राजीनामा बुधवारी दि.16 रोजी पंचायत संचालनालय पणजी येथे दिला. या राजीनामा पञात संतोष यांनी कुठलेही कारण घातले नाही. पेडणे मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रवीण आर्लेकर निवडून आल्यानंतर संतोष मळीक यांनी हा राजीनामा दिला आहे. त्यामुळे बाबू आजगावकर  समर्थक असलेले संतोष मळीक यांनी हा राजीनामा दिल्यानंतर पेडणे मतदारसंघातील इतरही  पंचायतीमध्ये सध्या धुसपूस सुरु आहे.चांदेल हसापूर पंचायतीच्या सरपंचपदी पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस यांची निवड होणार असल्याची चर्चा आहे.

Related Stories

‘त्या’ संशयित आरोपी महिलेला 14 दिवसांची पोलीस कोठडी

Amit Kulkarni

द. गोव्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली

Amit Kulkarni

ढवळी येथे दिवाळी बाजाराचे उद्घाटन

Amit Kulkarni

उचगाव नेम्मदी केंद्रामधील भ्रष्टाचारामुळे गोरगरिबांची पिळवणूक

Patil_p

कळंगूट येथे दगडाने ठेचून फेफरिनो बरेटोचा खून

Patil_p

दाबोळी विमानतळावर देशी पर्यटकांचा ओघ

Patil_p