Tarun Bharat

चाकरमान्यांच्या आगमनाने गर्दी वाढतीच

कणकवलीतील पार्किंगमध्ये दिसणारी बाहेरील गाडय़ांची गर्दी भीती निर्माण करणारी : रेडझोनमधील व्यक्तींच्या खुलेआम फिरण्याने कोरोना संक्रमणाचीही भीती

वार्ताहर / कणकवली:

लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर दिवसेंदिवस बाजारपेठेत होणारी गर्दी कमी होण्याचे नावच घेत नसल्याचे चित्र आहे. मुंबईकर व परजिल्हय़ातून येणाऱया लोकांना जिल्हय़ात प्रवेश दिल्यानंतर चाकरमान्यांच्या गाडय़ांच्या संख्येत व गर्दीत अजून वाढ होत आहे. मुंबईहून रेड झोनसारख्या आलेल्या भागातील वाहने व व्यक्तींचा शहरात खुलेआम सुरू असलेला वावर जिल्हय़ाच्यादृष्टीने धोकादायक होण्याची शक्यता आहे. पूर्वीप्रमाणे पोलीस किंवा अन्य यंत्रणांकडून ही गर्दी कमी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न होत नसल्याने चिंतेचे वातावरण आहे.

कणकवली शहरात गेल्या महिन्याभरात गर्दी रोखण्यासाठी पोलीस, नगरपंचायत व महसूल यंत्रणेकडून काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत होती. मात्र, चाकरमान्यांना जिल्हय़ात येण्याबाबत आदेश देण्यात आले व नियमानुसार किंवा नियम मोडून चाकरमानी दाखल होऊ लागल्यानंतर पोलीस व संबंधित यंत्रणांकडून करण्यात येणाऱया कारवाईतही शिथीलता देण्यात आली आहे. जिल्हय़ाच्या सीमेवरून दाखल होणाऱया वाहनांना थेट विलगीकरण कक्षाच्या ठिकाणी किंवा होम क्वारंटाईनसाठी दिलेल्या जागेवर जाणे गरजेचे असताना या व्यक्ती कणकवली शहरासह अनेक ठिकाणी खुलेआम फिरताना दिसत असल्याने कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत चिंतेत भर पडत आहे.

पटवर्धन चौकात पार्किंग तळ!

शुक्रवारी कणकवली बाजारपेठेसह शहरात बऱयापैकी वर्दळ असल्याचे चित्र होते.  पटवर्धन चौकात तर फ्लाय ओव्हरब्रिजच्या खाली वाहनांचा पार्किंग तळ तयार झाल्याचे चित्र होते. त्यामुळे हे सर्व नियंत्रणात आणण्यासाठी कठोर कारवाईची गरज आहे.

कणकवलीत गर्दीचे प्रमाण अधिक

बेगमीचा बाजार ही पद्धत गेली कित्येक वर्षे चालत आली असून पावसाळ्य़ाच्या पूर्वतयारीसाठी शेतकरी वर्ग बाजारात मोठय़ा प्रमाणात दाखल होत आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवस ही गर्दी अशीच राहण्याची शक्यता आहे. त्यातच कणकवली न. पं.ने वार व दिशेनुसार दुकाने सुरू ठेवण्याचे दिलेले नियोजनही पुरते कोलमडले आहे. कणकवली शहर जिल्हय़ाच्या मध्यवर्ती असल्याने देवगड, वैभववाडी वगळता वाहने कणकवलीतूनच पुढे जातात. येथे चाकरमानी खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे समोर आले आहे. बेगमीच्या खरेदीसाठी येणाऱया ग्रामीण भागातील जनतेतही कोरोनाचे संक्रमण पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत गांभिर्याने उपाययोजना करण्याची गरज आहे.

Related Stories

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरीपदी रामचंद्र उर्फ आबा दळवी

NIKHIL_N

खेडमध्ये एकाच रात्री चार फ्लॅट फोडले

Patil_p

सावंतवाडी तालुक्यातील पत्रकारांना दहा लाखाचे विमा कवच मिळणार- प्रवीण मांजरेकर

Anuja Kudatarkar

ओटवणे घाट रस्त्यातील संरक्षक कठडयासह रस्ता खचला

Anuja Kudatarkar

जिल्हय़ात सोमवारपासून शाळा सुरू नाहीच?

Patil_p

“पशुसंवर्धन”ची मोबाईल व्हॅन लवकरच नागरिकांच्या सेवेत

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!