Tarun Bharat

चाकरमान्यांसाठी असतील नियम, अटी

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून होणार निर्णय : गणेशोत्सव नियोजनासाठी ऑनलाईन बैठक

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

गणेश चतुर्थी कालावधीत कोकणात जाणाऱया चाकरमान्यांसाठी नियम व अटी लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून ठरवणार. कोणत्याही प्रकारे कोकणवासीयांना त्रास होणार नाही, याची काळजी सरकार घेणार आहे, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी गणेश चतुर्थी नियोजनासाठी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत सांगितले.

गणेश चतुर्थी कालावधीत कोकणात येणाऱया चाकरमान्यांचे नियोजन करण्याच्या उद्देशाने मुंबईतून राज्य सरकारमार्फत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन बैठक घेण्यात आली. परिवहनमंत्री अनिल परब, शिवसेना खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, शिवसेना, राष्ट्रवादी काँगेसचे वरि÷ नेते तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर येथील संबंधित अधिकारी यांच्यात ही बैठक झाली.

आमदार नाईक म्हणाले, मुंबईतील चाकरमान्यांच्या नियोजनाची बैठक जिल्हय़ात घेतली, तेव्हा क्वारंटाईन कालावधी सात दिवस करण्याचे ठरविण्यात आले. परंतु त्यानंतर झालेल्या सरपंच संघटनांच्या बैठकीत क्वारंटाईन कालावधी 14 दिवसच ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. गावच्या लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे यात तोडगा काढून दहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी करा आणि शक्मयतो चाकरमान्यांना त्यांच्या कुटुंबासमवेत त्यांच्याच घरात होम क्वारंटाईन करा, अशी सूचना वैभव नाईक यांनी मांडली. तसेच येणाऱया चाकरमान्यांना मुंबईहून टेस्ट करून 48 तासात कोकणात पाठवा. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही. थोडय़ा-थोडय़ा लोकांचे नियोजन करून एसटीमधून लोकांची कोकणात येण्याची व्यवस्था करावी. एकाच वेळी आले, तर जिल्हय़ाच्या यंत्रणेवर त्याचा ताण पडणार आहे, असेही नाईक यांनी सांगितले. त्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी तशी एसटीची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले. कोविड टेस्ट, प्रवासाची व्यवस्था, क्वारंटाईन कालावधी याबाबत बैठकीतून सर्वांच्या आलेल्या सूचनांनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून कोकणात जाणाऱया चाकरमान्यांबाबत योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी परब यांनी सांगितले.

Related Stories

खेडमध्ये हापूस अडीच हजार रूपये शेकडा

Patil_p

पूरग्रस्तांना चार दिवसात नुकसान भरपाई मिळणार

NIKHIL_N

अन्यथा महावितरण विरोधात व्यापक आंदोलन छेडणार!

NIKHIL_N

NMMS परीक्षेत उभादांडा हायस्कुलची प्रतिक्षा प्रदिप नाईक जिल्ह्यात प्रथम

Anuja Kudatarkar

विहिरीत पडलेल्या डुकराची विजेचा शॉक देऊन शिकार

NIKHIL_N

चिपळुणात युनियन बँकेचे एटीएम फोडून १४ लाखाची रक्कम लंपास

Archana Banage