Tarun Bharat

चाकूहल्ल्यात मारुतीनगरचा तरुण जखमी

प्रतिनिधी/ बेळगाव

एक वर्षापूर्वी झालेल्या वादावादीच्या कारणावरून मारुतीनगर येथील एका तरुणावर शनिवारी चाकूहल्ला करण्यात आला आहे. सांबरा रोडवरील एका बारजवळ ही घटना घडली असून माळमारुती पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.

सर्वेश कंग्राळकर (वय 22, रा. तिसरा क्रॉस, मारुतीनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. चाकूहल्ल्यात त्याच्या पाठीवर दुखापत झाली आहे. त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पुढील तपास करीत आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी सर्वेश व शिंदोळी येथील लक्ष्मण दड्डी या दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यावेळी पंचांसमक्ष समेट घडविण्यात आला होता. शनिवारी सांबरा रोडवरील राघव पॅलेस बारजवळ सर्वेश उभा होता. त्यावेळी लक्ष्मणने त्याच्याकडे डोळे वटारून पाहिले. याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. भांडणानंतर सर्वेशवर चाकूहल्ला करण्यात आला आहे.

Related Stories

यरमाळ रोड वडगाव येथे हेस्कॉमचा गलथानपणा नागरिकांच्या जीवावर

Amit Kulkarni

सन्मती कॉलेजच्या विद्यार्थिनींचे यश

Amit Kulkarni

गजानन महाराजनगर परिसरात कचऱयाचे साम्राज्य

Amit Kulkarni

सनबर्न आयोजकां विरोधात गुन्हा नोंद करा

Patil_p

खानापूर-पारवाड वस्ती बस सुरू करा

Omkar B

समाज कल्याण खात्याचा अजब कारभार

Amit Kulkarni