Tarun Bharat

चाक गेले पुढे पुढे… बस पाठीमागे

बिजगर्णी रस्त्यावर घडला अनोखा प्रकार : दुसरा टायर पंचर : सुदैवाने मोठी दुर्घटना टाळली

वार्ताहर /किणये

सोमवारी सकाळी सात-सव्वासातची वेळ, सूर्याची कोवळी किरणे, पक्षांची किलबिल आणि बिजगर्णी-बेळवटी रस्त्यावर किरकोळ वाहतूक असे चित्र असतानाच बेळगावहून येणाऱया एका बसचा टायर पुढे जात होता, अन् बस चक्क टायरच्या पाठीमागे.. असा प्रकार बिजगर्णी रस्त्यावर सोमवारी गावकऱयांना पहावयास मिळाला.

बस पाठीमागे आणि एक टायर रस्त्यावरून पुढे जात असतानाचे पाहून अनेक जण थक्क झाले. सोमवारी सकाळी बेळगावहून गोल्याळी गावाकडे बिजगर्णी रस्त्याने बस जात होती. यावेळी बसच्या पाठीमागच्या चाकाचा टायर बाहेर येऊन तो बसच्या पुढे जात होता अन् बस पाठीमागे राहिली. याचवेळी खड्डय़ात बस गेली आणि दुसरा टायरही पंक्चर झाला.

  अन् कार झाडाला आदळली

बसवाहक व चालकाला काहीच कळाले नाही. नंतर त्यांनी जाग्यावरच बस थांबविली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र समोरून येणाऱया एका कारगाडी चालकाने टायर व बसला चुकविण्यासाठी कार वळवली अन् ही कार झाडाला आदळली. यात कारगाडीचे किरकोळ नुकसान झाले.

सदर बस सकाळी गोल्याळी गावाला जाऊन तेथून प्रवाशांना घेऊन येणार होती. जाताना बसमध्ये केवळ चार ते पाच इतकेच प्रवासी होते. ही बस खराब असल्यामुळे असा प्रकार घडला असल्याची माहिती गावातील काही नागरिकांनी दिली आहे.

बस मुख्य रस्त्यावर बस थांबल्यामुळे वाहतुकीची कोंडी

 बस मुख्य रस्त्यावर थांबली असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. दुपारी दोनपर्यंत बस याच ठिकाणी थांबून राहिली होती. बसचे चाक बसवून दुपारनंतर ही बस त्या ठिकाणाहून हलविण्यात आली.

पश्चिम भागात नेहमीच नादुरुस्त व खराब बस सोडल्या जातात. त्यामुळेच असे प्रकार घडत आहेत. यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांनी याची दखल घेऊन या भागातही उत्तम दर्जाच्या बस सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

Related Stories

बाजारपेठेत पाकिटमार महिलांचा सुळसुळाट

Amit Kulkarni

केएलई मधुमेह केंद्रातर्फे उन्हाळी शिबिराचे उद्घाटन

Patil_p

सुळगे-येळ्ळूर ऍप्रोच रस्ता दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ

Omkar B

वरमहालक्ष्मीची पूजा भक्तिभावाने-श्रद्धेने

Patil_p

अखेर ‘ते’ रेशन दुकान पंचकमिटीकडे

Amit Kulkarni

घराचे छत कोसळून महिला ठार

Amit Kulkarni