Tarun Bharat

चाचण्या वाढवा; मास्क अत्यावश्यक

Advertisements

प्रतिनिधी / मुंबई

ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकरा आढळुन आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना स्थिती, कोरोना विषाणूचा दुसरा प्रकार व त्याअनुषंगाने घ्यावयाची काळजी, लसीकरणाची तयारी आदींबाबत आढावा घेतला.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात सर्वच यंत्रणांनी खूप मेहनत घेतली आहे. आता दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. अधिक मेहनत घ्यावी लागेल. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, औषधे यांचा पुरेसा साठा करून ठेवावा, अलगीकरण विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. हा विषाणू ज्या वेगाने पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवा, असेही त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल होतात का याचा अभ्यास टास्क फोर्समधील डॉक्टरांनी करावा. नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूमुळे उपचाराची पद्धत याबाबत टास्कफोर्सने अभ्यास करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत सहव्याधी (कोमॉरबिड) असलेल्या लोकांचा राज्यभरातील डेटा (माहिती) आरोग्य विभागाकडे आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेने अशा सहव्याधी रुग्णांशी संपर्क करावा, त्यांच्याशी संवाद साधून त्यांची आरोग्यविषयक काळजी घेतानाच त्यांना सतर्क करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 अशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकाळात अनावश्यक रहदारी टाळावी, असे आवाहन करतानाच आंतरराष्ट्रीय प्रवास केलेले प्रवाशी देशांतर्गत प्रवास करुन महाराष्ट्रात येतात. विविध राज्यातून येणाऱ्या अशा प्रवाशांकडे लक्ष द्यावे. त्यांच्याबाबतीत जागरूकता ठेवावी. त्यासाठी दिल्लीसह इतर राज्यांशी, प्रशासनाशी समन्वय साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाच्या तयारीची माहिती घेतली. यात लसीकरण करणारी यंत्रणा, पहिल्या टप्प्यात ज्यांना लस द्यावयाची आहे त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा संकलित करून तो पाठवणे, शीतगफहांची व्यवस्था, प्रशिक्षण आदी गोष्टींचा त्यांनी आढावा घेतला. जिल्हा टास्कफोर्सने लसीकरणासंदर्भात बैठका घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मास्क वापरल्याने कोरोना विषाणूचा मग तो जुना असो की त्याच्या प्रसाराला खुप मोठ्याप्रमाणात प्रतिबंध होतो. त्यामुळे राज्यातील जनतेला मास्क वापरण्यासाठी बंधनकारक करावे, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. मास्क लावा, हात धुवा आणि शारीरिक अंतर ठेवा ही त्रिसुत्री अंमलात आणणे कसे गरजेचे आहे याबाबत लोकांमध्ये नव्याने जागफती करा. त्यांना धोक्याची जाणीव करून द्या, असे आवाहन केले.

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, गफह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सल्लागार अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, राज्य टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आदी उपस्थित होते.

Related Stories

तुम्ही उकीरडे फुंकत हिंडलात ; राऊतांची भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेवर टीका

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

Abhijeet Shinde

महाविकास आघाडी सरकारकडून कृत्रिम वीज टंचाई : सुरेश हाळवणकर

Abhijeet Shinde

सोयाबीन खरेदीत अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदान

Abhijeet Shinde

महाराष्ट्र : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

Rohan_P

खासदार शरद पवार यांनी केले डाळिंब उत्पादकांचे कौतुक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!