Tarun Bharat

चातुर्मासानिमित्य जैन साधु – सांध्वींना प्रवासाला परवानगी

प्रतिनिधी / कोल्हापूर

जैन समाजाच्या चातुर्मास पर्वास जुलै महिन्यात प्रारंभ होत आहे. चातुर्मासाच्या कालावधीमध्ये जैन समाजातील साधु साध्वींना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी व तेथील समाज बांधवांच्या प्रबोधनासाठी लॉकडाऊनच्या काळात परवानगी मिळण्याविषयी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्याला यश येवून मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यभरात एकाच ठिकाणी अडकून बसलेल्या जैन साधु सांध्वींना आता इच्छित स्थळी जाता येणार आहे.

चातुर्मास काळात जैन समाजाचे साधु – साध्वी निश्चित केलेल्या चातुर्मास स्थळी पोहचविण्यासाठी पायी प्रवास करित असतात.काही वृध्द साधु साध्वी प्रकृतीच्या कारणास्तव व्हीलचेअरने प्रवास करतात. अशा प्रकारे प्रवास करून हे साधु-साध्वी चातुर्मास स्थळी त्यांच्या सेवक वर्गासह पोहचतात. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अनेक भागातून साधु-साध्वी प्रवास करू शकणार नाहीत. परंतु चातुर्मास सुरू होण्यापूर्वी त्यांना त्यांच्या निर्धारित स्थळी पोहचणे आवश्यक आहे.

त्यामुळे जैन समाजाच्या साधु-साध्वी व सेवक वर्ग यांना त्यांच्या चातुर्मास्थळी पोहचण्यासाठी राज्य शासनाने आदेश पारित करावे अशा आशयाचे पत्र खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी तात्काळ जैन साधू सांध्वींना इच्छित स्थळी जाण्यासाठी परवानगी देण्याचा आदेश पारित केला आहे.

त्यानुसार काही अटींच्या अधीन राहून राज्य शासनाने त्यांना परवानगी दिली आहे. पायी प्रवासा दरम्यान गर्दी होणार नाही. ५ पेक्षा जास्त जण एकत्रित प्रवास करणार नाहीत याची दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी त्यांचा मुक्काम आहे. त्याठिकाणी गर्दी होणार नाही. कोव्हीड-१९ संदर्भातील केंद्र व राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. प्रवासादरम्यान २ व्यक्तींमध्ये पुरेसे अंतर ठेवावे व मास्कचा वापर करण्याची दक्षता घ्यावी. त्यांच्या प्रवासादरम्यान व मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची सुरक्षितता व एकूणच कायदा व सुव्यवस्था राखली जाईल याची जिल्हा व पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी असे आदेश दिले.

खासदार धैर्यशील माने यांच्या पुढाकारामुळे जैन साधु साध्वींना प्रवासाकरिता परवानगी मिळाल्याबाबत गुजरी येथील जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल, राजेश निमजिया, उत्तम ओसवाल, नगरसेवक ईश्वर परमार, रतन गुंदेशा, बाबूलाल भानाजी, दिलीप रायगांधी, प्रीतम ओसवाल, दिलीप ओसवाल, पारस ओसवाल यांनी सोमवारी खासदार धैर्यशील माने यांची निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा बुके देऊन सत्कार केला तसेच त्यांचे आभार मानले.

Related Stories

पत्रकार दिनी सांगली जिल्हा पत्रकार संघातर्फे दुर्मिळ वृत्तपत्रांचे प्रदर्शन

Archana Banage

बस्तवडेला शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राची मंजुरी नाही : मंत्री सामंत

Archana Banage

कालकुंद्री येथे २८ पासून राष्ट्रीय सेवा श्रमसंस्कार शिबिर

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात पाच वाजेपर्यंत 184 जण कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

जिल्हय़ाला मुसळधार पावसाने झोडपले

Patil_p

शहरातील मटका, जुगार चालविणारे चारजण तडीपार

Patil_p