Tarun Bharat

चापगावात यंदापासून दुर्गामाता दौडला प्रारंभ

Advertisements

वार्ताहर /चापगाव

चापगाव येथील शिवप्रतिष्ठानतर्फे यावषीपासून श्री दुर्गामाता दौडला प्रारंभ करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या दिवशी शेकडो युवक, आबालवृद्धांनी दुर्गामाता दौडमध्ये सहभाग घेतला होता.

चापगाव येथे दरवषी नवरात्रोत्सव घटस्थापनेपासून दसऱयापर्यंत मंदिरात पूजाअर्चा करून साजरा करण्याची परंपरा आहे. चापगाव येथे दौड सुरू करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून खानापूर शिवप्रतिष्ठानच्या धारकऱयांतर्फे बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. चापगाव येथील युवकांनी यावर्षी दौड सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो धारकऱयांनी व युवकांनी उपस्थिती दर्शविली.

प्रारंभी छत्रपती शिवरायांना दुग्धाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर माजी सभापती सयाजी पाटील, ग्राम पंचायत उपाध्यक्ष मारुती चोपडे, छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर पाटील, पत्रकार पिराजी कुऱहाडे आदींच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले व शिवरायांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दौडीला प्रारंभ झाला.

धबाले गल्ली, श्रीकृष्ण मंदिर, कदम गल्ली, चव्हाट गल्ली, गणेश मंदिर, लक्ष्मी गल्ली लक्ष्मी मंदिर, पाटील गल्ली त्यानंतर आंबेडकर गल्ली व शिवाजी चौक परिसर भागातून दौड काढण्यात आली. त्यानंतर श्री फोंडेश्वर गल्लीमार्गे ग्रामदैवत श्री फोंडेश्वर मंदिरात दुर्गादेवीच्या आरतीने सांगता झाली.

यावेळी तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावात यावषीपासून सुरू करण्यात आलेल्या दुर्गादौडच्या नियोजनाबद्दल धारकऱयांना व गावातील लोकांना पुढील नऊ दिवस सहकार्य करून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

Related Stories

जायंट्स सप्ताहअंतर्गत ठळकवाडी हायस्कूलमध्ये मार्गदर्शन

Amit Kulkarni

फोर्ट रोड येथे सिग्नलवर कोसळली झाडाची फांदी

Amit Kulkarni

खडीमशीनच्या खाणी ठरताहेत मृत्यूचे सापळे

Patil_p

आयएमईआर एमबीएतर्फे आरंभ कार्यक्रम

Amit Kulkarni

महाकाली फुटबॉल चषक स्पर्धेत रिवरसाईड संघाला जेतेपद

Amit Kulkarni

शिरहट्टी येथे एका रात्रीत सहा ठिकाणी घरफोडी

Patil_p
error: Content is protected !!