Tarun Bharat

चायनीज व नायलॉन मांजाबाबत जनजागृती

Advertisements

न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत अभिनव अभियान

ऑनलाइन टीम  / पुणे :  

संक्रांतीला पतंग उडविण्याची आपली परंपरा आहे. परंतु बहुतांश ठिकाणी बंदी असलेला चिनी व नायलॉन, सिंथेटिक मांजा वापरण्यात येतो. या मांजाने गळा कापल्याने मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक जण गंभीर जखमी होण्याबरोबरच शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागला आहे. याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. त्यासाठी मानवी रचनेतून रंगीबेरंगी पतंगाचा आकार साकारण्यात आला होता. शाळेच्या आवारात मोठ्या आकारातील पतंगांवर घोषवाक्य लिहिण्यात आली होती.

सोसायटीच्या आजीव सदस्या डॉ. सविता केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मु‘याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांच्या संकल्पनेतून जयंत टोले, चारुशिला प्रभुदेसाई, महेश जोशी, शेखर कोष्टी, रवींद्र सातपुते, सुरेश वरगंटीवार यांनी संयोजन केले.

मी शपथ घेतो की पतंग उडवताना मी माझी व इतरांची काळजी घेईन. मी पतंगासाठी घातक असा मांजा वापरणार नाही. पतंगाच्या मांजामुळे कोणाच्याही जिवाला धोका उत्पन्न होईल अशी कृती मी करणार नाही. पतंगाचा खेळ हा ङ्गक्त आनंदासाठी आहे हे मी लक्षात घेईन. सुरक्षितपणे उडवू पतंग, जीवनात भरू आनंदाचे रंग अशी शपथ घेण्यात आली.

Related Stories

विविध ठिकाणच्या सामाजिक कार्यातून पुण्याचा एकत्रित विकास

Rohan_P

‘बोन्साय’ कलेत डॉक्टरेट मिळविणाऱया प्राजक्ता काळे जगातील पहिल्या व्यक्ती

tarunbharat

धक्कादायक : ऑस्ट्रेलियामध्ये १० हजार उंटांना गोळ्या घालून केले ठार

prashant_c

मराठा शौर्य दिनी लालमहालात रंगावली, मर्दानी खेळ, शस्त्रपूजन

Rohan_P

‘ट्विन टॉवर’चा ‘द एंड’!

Patil_p

केन तनाका ठरल्या जगातील सर्वात वयोवृद्ध महिला

datta jadhav
error: Content is protected !!