Tarun Bharat

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

सातारा तालुक्यातील पाटखळ माथा येथे चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी झाला. वसंत परबती सोनमळे असे जखमीचे नाव असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आनंदराव बबनराव धुमाळ या कार चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अभिजित नंदकुमार सोनमळे (वय 28, रा. लिंब, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवार, दि. 12 मार्च रोजी त्यांचे चुलते वसंत परबती सोनमळे हे त्यांच्या दुचाकीवरुन (एमएच 11 – सीएल 1823) निघाले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ते पाटखळ माथा येथील कदम पेट्रोल पंपासमोर लोणंद-सातारा रस्त्यावर आले असताना समोरुन आनंदराव बबनराव धुमाळ (रा. गेंडामाळ, शाहूपुरी, सातारा) हा चारचाकीने (एमएच 04 – सीबी 8336) वेगाने आला होता.

निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणाने वेगाने चारचाकी घेवून आलेल्या आनंदराव याने वसंत सोनमळे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी अभिजित सोनमळे यांनी शनिवार, दि. 13 मार्च रोजी सायंकाळी   फिर्याद दिल्यानंतर धुमाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक समीर महांगडे करत आहेत.

Related Stories

साताऱयात आदेश उल्लंघन करणाऱया 15 जणांवर गुन्हे

Patil_p

सातारा : सोंडपार येथे पाण्याच्या कुंडामध्ये पडला गवा

Abhijeet Shinde

मांजा विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा

datta jadhav

पाटोळ खडकीत 6 पॉजिटिव रुग्ण सापडल्याने खडकीची संख्या 8

Patil_p

खासदार राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध

Patil_p

सातारा : पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक शांततेत पार पाडा : निवडणूक निरीक्षक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!