Tarun Bharat

चारधाम यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित : उत्तराखंड सरकार

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंड सरकारने मंगळवारी सकाळी चारधाम यात्रेसंदर्भात नवीन एसओपी जारी केली आहे. यानुसार सरकारने आगामी 1 जुलै पासून सुरू होणारी प्रस्तावित चारधाम यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित केली आहे. 


दरम्यान, सोमवारी जारी करण्यात आलेल्या एसओपीमध्ये सरकारने उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीनंतर देखील चारधाम यात्रा 1 जुलैपासून सुरू करण्यात येईल असा निर्णय घेतला होता. तर दुसऱ्या टप्प्यातील यात्रा 11 जुलैपासून सुरू होईल असे सांगण्यात आले होते. यापूर्वी  उत्तराखंड उच्च न्यायालयाने 7 जुलैपर्यंत यात्रेवर बंदी घातली होती.

  • पहिल्या टप्प्यात तीन जिल्ह्यांसाठी होणार होती सुरू 


सरकारने पहिल्या टप्प्यात बद्रीनाथची यात्रा चमोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी, केदारनाथ यात्रा रूद्रप्रयाग जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणि गंगोत्री व यमुनोत्री यात्रा उत्तरकाशी जिल्ह्यातील नागरिकांसाठी काही शर्तीसह सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये भाविकांना कोरोना चाचणी करणे तसेच रिपोर्ट निगेटीव्ह असणे अनिवार्य असेल असे म्हटले होते. मात्र आता पुढील आदेशापर्यंत यात्रा स्थगित करण्यात आली आहे. 

Related Stories

नितीन गडकरींना धमकीचा फोन बेळगावच्या तुरुंगातून…

datta jadhav

अयोध्येतून निवडणूक लढविणार योगी?

Patil_p

आलेक्स रेजिनाल्ड अपक्ष म्हणून लढवणार निवडणूक

Abhijeet Khandekar

पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा तरुण अटकेत

datta jadhav

पंजाबमधील कोरोना रुग्णांनी पार केला 90 हजारांचा टप्पा

Tousif Mujawar

भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांचा नोंदवला जाणार जबाब

Archana Banage