Tarun Bharat

चारधाम यात्रा सुरू करण्याबाबत उत्तराखंड सरकारचा ‘यू टर्न’

  • 16 जूननंतर यात्रा सुरू करण्याबाबत करणार विचार 


ऑनलाईन टीम / देहरादून :


चारधाम यात्रा सुरू करण्याबाबतचा आदेश उत्तराखंड सरकारने स्थगित केला आहे. ही यात्रा का स्थगित केली जात आहे याचे कारण देखील सरकारने दिले आहे. प्रदेश सरकारने सांगितले की, चारधाम यात्रेवरून नैनिताल हाय कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे चारधाम यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


दरम्यान, प्रदेश सरकारने कालच म्हणजेच सोमवारी चमोली, रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी मधील नागरिकांसाठी काही शर्तींसह चारधाम यात्रा सुरू करत असल्याचे सांगितले होते. मात्र, सरकारने आपला हा निर्णय बदलला असून पुन्हा एकदा यात्रा स्थगित केली आहे. 


याबाबत अधिक माहिती देताना शासकीय प्रवक्ते सुबोध उनियाल यांनी सांगितले की, नैनिताल हाय कोर्टात चारधाम यात्रे संबंधात सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे. पुढे ते म्हणाले की, 16 जून नंतर ही यात्रा सुरू करण्याबाबत विचार केला जाईल. 

Related Stories

ललित मोदींनी मुलाला बनवले उत्तराधिकारी

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये 5 व्या टप्प्यातील प्रचार समाप्त

Patil_p

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत कमल हसन सहभागी होणार

Abhijeet Khandekar

सर्वात उंच मूव्हिंग थिएटर लडाखमध्ये

Patil_p

कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू

datta jadhav

देव तारी त्याला कोण मारी ; दरीत उडी घेणारी युवती सुखरूप

Anuja Kudatarkar