तरुण भारत

चारधाम यात्रेसाठी निघालेले पाच यात्रेकरु ठार

उत्तरप्रदेशमधील नोईडा येथे बोलेरोची डंपरला धडक

प्रतिनिधी/ बारामती

Advertisements

चारधाम यात्रेसाठी निघालेल्या बारामतीतील यात्रेकरुंच्या बोलोरो जीपला नोईडा (उत्तरप्रदेश) येथे अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार झाले. यामध्ये बेळगावच्या एका महिलेचाही समावेश आहे. चंद्रकांत नारायण बोराडे आणि सुवर्णा चंद्रकांत बोराडे या दाम्पत्यासह रंजना भरत पवार व मालन विश्वनाथ कुंभार (सर्व रा. बारामती.) तसेच नुवंजन मुजावर (वय 53 रा. हिरेकुडी, जि. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. जीप चालक नारायण कोळेकर (वय 40, रा. फलटण, जि. सातारा) आणी सुनिता गस्ते (वय 35, निपाणी, रा. बेळगाव) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

   चारधाम यात्रेसाठी एकुण 50 लोक महाराष्ट्रातून निघाले होते. बुधवारी 11 रोजी रात्री वृंदावन याठिकाणी त्यांनी मुक्काम केला. गुरूवारी पहाटे पाच ते साडेपाचच्या सुमारास ते दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले. जेवर या गावाजवळ त्यांच्या बोलेरो जीपने डंपरच्या मागील बाजुस जोरात धडक दिली. या भिषण अपघातात पाचजण जागेवरच गेले. तर दोघे गंभीर जखमी असून इतर प्रवासी सुखरूप आहेत. त्यांनीच अपघातग्रस्तांना अपघात झाल्यावर मदत केली.

अतिरिक्त डीसीपी ग्रेटर नोएडा विशाल पांडे यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. येथे 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत. जखमी आणि मृतांमध्ये बारामती, फलटणसह बेळगावमधील प्रवाशी आहेत.  जखमी जीपचालकावर नोएडातील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. दोन्ही वाहने महामार्गावरुन बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळित करण्यात आली.

  दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघाताची दखल घेतली असून दिल्लीमध्ये यंत्रनेला मदतीचे आदेश त्यांनी स्वतः दिले आहेत. तसेच खासदार सुळेंनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना फोन करून अपघातात ठार झालेल्यांचे मृतदेह बारामतीला आणण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी विनंती केली आहे.

 दरम्यान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून नातेवाईकांच्या दुखःत सहभागी असल्याचे म्हटले आहे.

Related Stories

डॉ. संदीप काटे करणार नॉन स्टॉप अंजिक्याताऱयांची चढाईउतराईची मोहिम

Patil_p

पाटणच्या ठगाचा पुण्यातल्या तरुणीला गंडा

Patil_p

परराज्यात जाणाऱ्या मजूरांचा खर्च काँग्रेस पक्षातर्फे केला जाणार: जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव

Abhijeet Shinde

विनाकारण फिराल तर कारवाईला सामोरे जाल…

Patil_p

अजिंक्यतारा सहकारी साखरचा ३७ वा गळीत हंगाम उत्साहात

Abhijeet Shinde

गुटखा वाहतूक करणाऱ्या गाडीसह बारा लाखाचा ऐवज जप्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!