Tarun Bharat

चार दिवसात ग्रेड सेपरेटरमधील सीसीटीव्ही होणार सुरु

प्रतिनिधी/सातारा

बांधकाम विभागाने सातारा पालिकेकडे दि.2 रोजी ग्रेड सेपरेटरचे हस्तातरण करण्याबाबतचे पत्र दिले गेले आहे. त्याच पत्राच्या अनुषंगाने आज पालिकेचे पदाधिकारी आणि बांधकाम विभागाचे अभिंयंता त्यांनी संयुक्तीक ग्रेड सेपरेटरचा पाहणी दौरा केला. ग्रेड सेपरेटरमधील सीसीटीव्ही बसवण्याचे काम 50 टक्के पूर्ण झालेले आहे. हे काम चार दिवसात पूर्ण होवून सीसीटीव्ही सुरु होतील, तसेच रात्रीची ग्रेड सेपरेटरमधील लाईट गेल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरची व्यवस्था करण्यात येणार आहे, त्याकरता बांधकाम विभागाने प्रस्ताव द्यावा, अशा सुचना देण्यात आल्या.

या पाहणी दौऱयात उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, साविआचे ज्येष्ठ नगरसेवक ऍड. दत्ता बनकर, पालिकेचे अभियंता दिलीप चिद्रे, प्रदीप साबळे, बांधकाम विभागाचे अभियंता रविकांत आंबेकर, अभियता अहिरे आदी उपस्थित होते. ग्रेड सेपरटेरच्या पाहणीमध्ये त्यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्याकडून ग्रेड सेपरेटरमधील गटरचे पाणी बाहेर कुठे काढले आहे. त्याचे चेंबर स्वच्छ आहेत का?, त्याची यंत्रणा कशी आहे याची माहिती घेतली. तहसील कार्यालयाच्या समोरील चेंबर हे हुतात्मा स्मारकाच्या बाजूकडे काढले आहे. तर कराड बाजूकडे असलेल्या बोगद्याचे गटर हे सायन्स कॉलेजनजिकच्या ओढय़ात काढले आहे, असे सांगण्यात आले. रात्रीच्या वेळी विद्युत प्रवाह हा खंडीत झाल्यास त्यावर उपाययोजना काय करता येईल यावर चर्चा झाली असता एवढय़ा यंत्रणेला चार्जिंग बॅटऱया उपयोगी होणार नाहीत. तर त्याकरिता जनरेटर बसवणे योग्य ठरेल याकरिता बांधकाम विभागाने इस्टीमेट तयार करुन द्यावे, अशा उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिल्या. तसेच ग्रेड सेपरेटरच्या आतमध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव सीसीटीव्ही बसवण्याचे काम 50 टक्के झालेले आहे. ते गुरुवारपर्यंत पूर्ण होवून कार्यन्वित होतील, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

महाराष्ट्र केसरीसाठी जिह्यातून मॅटसाठी सरक तर मातीसाठी सुळ

Patil_p

आंदोलनाच्या रेट्यामुळेच निवृत कामगारांच्या पदरात 5.67 कोटी

datta jadhav

फसवणुकप्रकरणी सातारच्या डॉक्टर दाम्पत्याला कारावास

Patil_p

नेत्यांच्या अलिशान गाडय़ांना खड्डे जाणवेनात

Patil_p

ठाकरे सरकारची जाहिरातबाजीवर १६० कोटींची खैरात

datta jadhav

खासदार उदयनराजेंचा झटका, बहुउद्देशीय ग्रेड सेपरेटरचे केले अचानक उद्घाटन

Archana Banage