Tarun Bharat

चार महत्वाच्या परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक

दिल्लीतील विद्यार्थ्याचा वैशिष्टय़पूर्ण विक्रम

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

दिल्लीत वास्तव्यास असणाऱया कार्तिकेय कौशिक या विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग संबंधित सर्व महत्वाच्या प्रवेश परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. या विद्यार्थ्याने प्रथम जेईई मेन्स, नंतर जेईई ऍडव्हन्सड्, त्यानंतर इंजिनिअरिंगची पदव्युत्तर प्रवेश परीक्षा गेट आणि त्यानंतर केंद्रीय सार्वजनिक सेवा आयोगाची परीक्षा अशा चारही महत्वाच्या परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. असा पराक्रम गाजविणारा तो आतापर्यंतचा एकमेव विद्यार्थी आहे.

जेईई मेन्स आणि जेईई ऍडव्हान्सड् या दोन्ही प्रवेश परीक्षांमध्ये तो प्रथम आला होता. नंतर त्याने आयआयटीमधून बी. टेक. ही पदवी प्राप्त केली. नंतर त्याने गेटची परीक्षा प्रथम क्रमांकाने यशस्वी केली. त्यामुळे त्याची इंडियन ऑईल या कंपनीत नोकरी सुनिश्चित झाली. ही नोकरी त्याने केवळ प्रशिक्षण पूर्ण होईर्पंतच केली. नंतर तो केंद्रीय सार्वजनिक सेवा आयोगाची इंजिनिअरिंग सेवा परीक्षाही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. या यशासाठी त्याचे कौतुक होत आहे.

सातत्याने अभ्यास आणि आत्मविश्वास हे आपल्या यशाचे सूत्र आहे असे त्याने पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. इंजिनिअरिंग सेवा परीक्षा देण्यासाठी मी इंडियन ऑईल कंपनीतील मोठय़ा वेतनाची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य होता हे माझ्या कामगिरीमुळे सिद्ध झाले, असे प्रतिपादन त्याने केले.

Related Stories

रिटा बहुगुणांवर पायलट यांची टीका

Patil_p

या देशात काहीही घडू शकतं

Patil_p

आयआरसीटीसीची नवी वेबसाईट, मिनिटाला 10 हजार तिकिटांचे बुकिंग शक्य

Tousif Mujawar

दिल्लीत मागील 24 तासात 1,550 नवीन कोविड रुग्ण; 207 मृत्यू

Tousif Mujawar

एअर इंडियाचा व्यवहार संपूर्णपणे देशविरोधी : सुब्रमण्यम स्वामी

prashant_c

Sanjay Raut : अमित शहा महाराष्ट्राचा नंबर वन शत्रू; ‘सामना’मधून संजय राउतांची टिका

Abhijeet Khandekar