Tarun Bharat

चार राज्यांतील भाजपच्या विजयाचा कारवारमध्ये जल्लोष

प्रतिनिधी / कारवार

उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणीपूर आणि गोव्यात विधानसभा निवडणुकीत भाजपने मारलेल्या बाजीच्या निमित्ताने येथील भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आणि विजयोत्सव साजरा केला. निवडणूक निकालांचे कल स्पष्ट होताच गुरुवारी दुपारी भाजपचे कारवार नगरअध्यक्ष नागेश कुर्डेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप समर्थकांनी येथील सविता सर्कलमध्ये फटाक्यांची आतषबाजी केली. त्याचबरोबर मिठाई एकमेकांना भरवून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी वंदे मातरम्, भारत माता की जय, जय श्री राम, जोर से बोलो प्यार से बोलो योगी योगी आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी उपस्थितांना उद्देशून बोलताना कारवारचे उपनगराध्यक्ष प्रकाश नाईक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब, दीनदलित, शेतकरी वर्ग आणि मागासवर्गीयांच्या कल्याण्यासाठी हाती घेतलेल्या कार्यक्रमांची परतफेड मतदारांनी मतदानाद्वारे केली आहे. यावेळी किसन कांबळेसह भाजपच्या वेगवेगळय़ा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हय़ातील भाजप नेते आनंदी

कारवार जिल्हा गोव्याशी भौगोलिकदृष्टय़ा संलग्न असल्याने कारवारच्या आमदार रुपाली नाईकसह अनेक नेत्यांनी गोव्यातील भाजप उमेदवारांचा जोर लावून प्रचार केला होता. प्रचारात सहभागी झालेल्या जिल्हय़ातील सर्व
नेत्यांच्या चेहऱयावर आज हास्य पसरले होते.

Related Stories

निलजीत धर्मवीर छ.संभाजी महाराज मूर्तीचा आगमन सोहळा उत्साहात

Amit Kulkarni

श्री संतसेना मंदिर व हॉलचे नूतनीकरण करण्याकरिता मदतीचे आवाहन

Rohit Salunke

एटीएममधून पैसे काढताना खबरदारीची गरज

Patil_p

कलंडलेले विद्युत खांब केले पुन्हा उभे

Amit Kulkarni

बागलकोट जिल्हय़ात आणखी 26 जणांना कोरोना बाधा

Patil_p

केवळ रुग्ण नव्हे तर डॉक्टरांकडेही पाहा!

Patil_p