Tarun Bharat

चार हजार शेतकऱयाची बँक खाती ‘निराधार’

Advertisements

कर्जमाफीसाठी आधार जोडणी आवश्यक

प्रतिनिधी/ रत्नागिरी

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱयांच्या बँक खाती आधार क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. मात्र  जिल्हातील तब्बल 4247 पात्र शेतकऱयांनी आपला आधार क्रमांक बॅक खात्याशी अद्यापही जोडलेला नसल्याचे समोर आले आह़े  योग्य वेळेतही जोडणी न झाल्यास या शेतकऱयांना कर्जमाफीपासून वंचीत राहावे लागण्याची शक्यता आहे.

    जिल्हातील 16,202 शेतकरी सरकारच्या कर्जमाफी योजनेसाठी पात्र आहेत़  या शेतकऱयांच्या खात्यात कर्जमाफीसाठी 36 कोटी 41 लाख रूपये जमा होणे प्रस्तावित आहेत. या योजनेसाठी ‘आपले सरकार’ या पोर्टलची मदत घेतली जाणार आह़े पोर्टलवर संबधित शेतकऱयाचा आधार क्रमांक योग्य आहे का ? कर्जमाफीची रक्कम शेतकऱयास मान्य आहे का? आदी प्रश्नांची उत्तरे देऊन पोर्टलवरती ‘होय’ या पर्यावरती क्लिक करताच काही दिवसातच ही रक्कम शेतकऱयाच्या खात्यात जमा होईल अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी यांनी दिली.

   ही प्रकीया अत्यंत सुटसुटीत आह़े मात्र जिल्हातील 4 हजारांहून अधिक  शेतकऱयांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जोडले गेले नसल्याची बाब समोर आली आह़े 1 प्रेबुवारी पासून शेतकरी कर्जमाफीची योजना कार्यान्वीत होणार आहे तत्पुर्वी शेतकऱयांनी आपला आधार क्रमांक बेक कर्ज खात्याशी जोडून घेणे आवश्यक आहे. या मुदतीत ही प्रक्रिया पुर्ण न केल्यास संबधीत शेतकऱयांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

ऑफलाईन अर्ज करण्याची मुभा

  कर्जमाफीसाठी ऑनलाईन सुविधा आह़े मात्र शेतकऱयाला ते शक्य नसल्यास तहसिलदारांमार्फत ऑफलाइन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. कर्जमाफीपासून कोणीही शेतकरी वंचित राहू नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

 

बँक- आधार अद्ययावत करावे : जिल्हाधिकारी

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी बँक-आधारकार्ड अद्ययावत असणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱयांनी कर्ज खात्याला आधार क्रमांक जोडावा तसेच कर्ज प्रकरणातील नाव व आधार कार्ड वरील नावात काही तफावत असेल तर तातडीने आधारकार्डातील तपशील प्रमाणे बँकेच्या कर्ज प्रकरणातील नावात व इतर तपशीलात दुरुस्ती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

Related Stories

सरपंचपदासाठी अनेकांचे नशिब फळफळले तर काहींचे बाशिंग उतरले

Archana Banage

रत्नागिरी : ‘प्लाझा थेरपी केंद्रा’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

Archana Banage

घातक रसायन ओतणारे दोन टँकर रंगेहाथ पकडले!

Omkar B

जिल्हा प्रशासनाच्या कारभाराचा अजब नमुना

Patil_p

100 वर्षे जुन्या ऐतिहासिक वास्तूत वृद्धांसाठी आनंदाश्रम!

Patil_p

निवडणूक आयोगाची यावर्षी लोकशाही दीपावली स्पर्धा

Patil_p
error: Content is protected !!