Tarun Bharat

चालकरहित ट्रक्टर, बदलणार शेतीचे कल्चर

अमेरिका ही आजही अनेक अभिनव शोधांची जननी आहे. या देशातील जॉन डायर या जगप्रसिद्ध कंपनीने आता चालकाची आवश्यकता न भासणाऱया ट्रक्टरची निर्मिती केली आहे. चालकविरहित कार्स अद्यापही प्रायोगिक पातळीवर असताना हा चालकविरहित ट्रक्टर मात्र शेतांमध्ये धावूही लागला आहे.

हा स्मार्ट ट्रक्टर आहे. शेत नांगरताना त्याच्या समोर कोणताही पशू किंवा माणूस किंवा कोणतीही जिवंत व्यक्ती आली तर तो अपोआप थांबतो. मात्र निर्जिव वस्तूचा अडथळा वाटेत आल्यास तो दूर करण्याची त्याची क्षमता आहे. तसेच तो किती वेळ सुरु ठेवायचा आणि त्याने कशाप्रकारे काम करायचे याचे आधी प्रोग्रॅमिंग करता येते. त्या आज्ञांच्या अनुसार तो काम करतो. काम झाल्यानंतर आपोआप थांबतो. इंधनाची बचत करण्याचीही त्याची क्षमता आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रानुसार त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

याची किंमत किती असेल याची घोषणा अद्याप कंपनीने केलेली नाही. प्रारंभीच्या काळात तो महाग असेल. तथापि, उत्पादन वाढल्यानंतर त्याची किंमत अपोआप कमी होण्याची शक्यता आहे. तो भारतात येण्यासाठी अद्याप काही काळ लागणार आहे. शेती व्यवसायात सध्या कामगारांची कमतरता आहे. अशावेळी हा विना चालक काम करणारा ट्रक्टर लाभदायक ठरु शकतो. अर्थात भारतातील तुकडय़ा तुडक्यांच्या शेतीला तो किती उपयोगी पडेल हा प्रश्न असला तरी मोठय़ा शेतांमध्ये तो किफायतशीर ठरु शकतो, असे सांगण्यात येत आहे.

Related Stories

महिलेचे ‘सुगंधा’वर प्रेम

Patil_p

घनदाट केसांनी होतेय लाखोंची कमाई

Patil_p

आज कंकणाकृती सूर्यग्रहण

datta jadhav

सुधीर गाडगीळ यांना अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा पुरस्कार जाहीर

prashant_c

फुटले सर्वात मोठे मत्स्यालय

Patil_p

प्रदुषणाची धास्ती

Patil_p