Tarun Bharat

चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक घुसला कंपनीत; मोटरसायकलस्वार जखमी

पुलाची शिरोली/ वार्ताहर

टोप ता. हातकणंगले येथे रस्त्याकडेला उभारलेल्या मोटारसायकलस्वारास गंभीर जखमी करुन ट्रक एका कंपनीत घुसला. यामध्ये सुनील बाळासो पाटील वय ४५, रा. टोप, ता. हातकणंगले हे जखमी झाले. तर मोटारसायकल व विशाल इंडस्ट्रीज या कंपनीचे सुमारे पावणे पाच लाखाचे नुकसान झाले. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत टोप येथे असणार्‍या सेवा मार्गावर दुपारी बारा वाजता हा अपघात झाला.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, बिरु सदाशिव लोखंडे ( वय २५, रा. ओम साई गणेश, एमडीटीएस, विजापूर, कर्नाटक ) हा आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन टोप येथील तंबाखू संघाच्या पेट्रोल पंपासमोरील सेवा मार्गावरून टोपकडे निघाला होता. विशाल इंडस्ट्रीज येथे ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. सर्वप्रथम त्याने रस्त्याकडेला मोटारसायकल लावून उभे असणारे सुनील पाटील यांना धडक दिली. या धडकेत सुनील पाटील गंभीर जखमी झाले. त्यानंतर हा ट्रक विशाल इंडस्ट्रीजची कंपाऊंड भिंत व गेट तोडून थेट कंपनीत घुसला. यामध्ये कंपनीतील साहित्य व इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुनील पाटील यांचे भाऊ रणजीत यांनी याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Related Stories

सदस्य नोंदणीत जिल्हा शिवसेना मागे का ?

Archana Banage

कोल्हापूर : म्युकरने दोघांचा मृत्यू, 3 नवे रूग्ण

Archana Banage

खंडपीठ कृती समितीची जानेवारीत मुख्य न्यायमूर्तींशी भेट

Abhijeet Khandekar

श्रेयस अय्यर वनडे मालिकेतून बाहेर

Patil_p

पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको ; सुप्रीम कोर्टाच्या निवडणूक आयोगाला सूचना

Abhijeet Khandekar

स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्री ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

Archana Banage