Tarun Bharat

चालत्या गाडीतून गुटखा थुंकणे पडले महागात; भरावा लागला 500 रुपये दंड

ऑनलाईन टीम / आग्रा : 


देशात सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यातच आग्र्यातील एका निवासी व्यापाऱ्याला गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणे चांगलेच महागात पडले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, आग्र्यातील एका निवासी व्यापारी चालत्या गाडीतून गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकला, त्यावेळी पोलिसांनी त्याच्या या कृत्याचा फोटो काढून त्याच्याकडून 500 रुपये दंड वसूल केला. ही घटना पालीवाल पार्कमध्ये मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली. त्यावेळी पोलिसांची टीम याठिकाणी चेकिंग करत होती. 


अजय उपाध्याय असे या व्यापाराचे नाव आहे. अजय हे मंगळवारी सकाळी पालीवाल पार्क मधून  जात होते, त्यावेळी त्यांनी आपल्या गाडीची काच खाली करून गुटखा थुंकू लागले. त्यावेळी हरिपर्वत पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक अजय कौशल आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत चेकिंग करत होते. त्यावेळी त्यांनी ही कारवाई केली होती. 


याबाबत अधिक माहिती देताना अजय कौशल म्हणाले, कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर थुंकण्यास मनाई आहे. त्यामुळे अजय उपाध्याय यांच्याकडून 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच यापुढे सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याची ताकीद देण्यात आली आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले. 

Related Stories

अरुसासोबत सोनियांचे छायाचित्र, चौकशीपासून माघार

Patil_p

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 7.77 लाखांवर

datta jadhav

विधानसभेत प्रचंड गदारोळ

Patil_p

रुपाली चाकणकरांनी गृहमंत्र्यांकडे केली देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याची मागणी

Archana Banage

उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना CBI कडून क्लीन चिट

datta jadhav

ट्रम्प यांचे घूमजाव…

datta jadhav