Tarun Bharat

चालू आर्थिक वर्षात मुख्य सात क्षेत्रांवर कोरोनाची छाया

Advertisements

नवी दिल्ली  :

नवी दिल्ली  : कोरोनाचा वाढता प्रसार व त्यामुळे देशातील रुग्ण संख्येत होणारी वाढ आणि संपूर्ण देशात लागू करण्यात आलेले लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेची चिंता ही बाब ठरत आहे. परंतु त्यासोबतच देशातील अर्थव्यवस्थेचा कणा असणारे उद्योगधंदेही नुकसानीच्या छायेत आले आहेत. यात एफएमसीजी क्षेत्र वगळता अन्य उद्योग क्षेत्रांना मात्र धोक्मयांची घंटा असल्याचे संकेत पेडिट रेटिंग एजन्सी केअर रेटिंग्स इंडस्ट्रीज यांनी तयार केलेल्या एका अहवालातून सांगितले आहे. यामध्ये अगोदरपासूनच संकटाचा सामाना करणाऱया वाहन, हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रांना सर्वाधिक नुकसान होण्याचे अनुमान नोंदवले आहे. पर्यटन उद्योगाचा चालू वर्षातील  1.25 लाख कोटी रुपयाच्या महसूलाचे नुकसानीचा अंदाज आहे. मात्र दररोज वापरात असणाऱया वस्तूं, सॅनिटायझर आणि क्लीनर आदीच्या मागणीत वाढ झाल्याने एफएमसीजी क्षेत्रात तेजीचे वारे राहणार आहे.

1. वाहन क्षेत्र :

देशातील वाहन उद्योगाला लागणारा टायर हा 25 ते 30 टक्के चीनमधून आणला जातो. परंतु कोरोनामुळे चीनमध्ये लॉकडाउन करण्यात आल्याने पुरवठा बंद होता. त्यामुळे अन्य देशातून मागणी खर्च व वेळेमुळे केली नाही. भारताकडून चीनला 0.5 टक्के ट्रान्स्पोर्टचे साधने निर्यात केली जतात. मागील आर्थिक वर्षात भारताने चीनकडून 8.6 टक्के ट्रान्स्पोर्ट साधने आयात केली होती. चीनमधील उद्योगाचे काम अजून पूर्णपणे सुरु झाले नसल्यामुळे देशातील वाहन क्षेत्राला 800 कोटी डॉलरच्या (60 हजार काटी रुपये) आयातीवर परिणाम होणार असल्याचे संकेत आहेत.

2. विमान वाहतूक :

संपूर्ण देश कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आला आहे. यामुळे सर्व उड्डाणे रद्द करण्यात आल्याने विमान कंपन्यांकडे आर्थिक नुकसान होत असल्याने त्या मोठय़ा चिंतेत पडल्या आहेत. याचाच प्रभाव म्हणून चालू आर्थिक वर्षात (2020-21) प्रवासी संख्येवर मोठय़ा प्रमाणात नकारात्मक परिणाम होणार असून त्यामुळे 20 ते 25 टक्क्मयांपर्यंत प्रवासी संख्येत घट होण्याचा अंदाज आहे. 2018-19 मध्ये ही प्रवासी वधारण्याची संख्या 13.7 टक्के होती. तर 2019-20 मध्ये 11 महिन्यात हा टक्का 3.7 टक्के राहिला होता.

3.हॉटेल-पर्यटन क्षेत्र :

कोरोनाच्या प्रभावामुळे जानेवारी ते मार्च या तिमाही हॉटेल उद्योगासाठी मोठी निराशाजनक स्थिती राहिली आहे. या वर्षात हॉटेलच्या रुमसाठी आकारण्यात येणाऱया दरात 40 टक्क्मयांपर्यंत कमी येण्याची शक्मयता आहे. एप्रिल ते सप्टेंबरमध्ये याचा सर्वाधिक प्रभाव दिसून येणर आहे. तर यातून मिळणाऱया महसूलतही जवळपास 58 ते 64 टक्क्मयांपर्यंत घसरण होण्याचे संकेत आहेत. देशात उन्हाळय़ाच्या सुट्टय़ाचे जास्तित जास्त करण्यात आलेले आरक्षण रद्द करण्यात आले आहे. दुसऱया बाजूला पर्यटन क्षेत्राला चालू आर्थिक वर्षात 1 लाख 25 हजार 550 कोटी रुपयाच्या महसूलामध्ये तोटा होण्याचे अनुमान आहे. 2019 मध्ये देशामध्ये 1.09 कोटी विदेशी पर्यटक आले होते. त्यामुळे 2 लाख 10 हजार 971 कोटी रुपयाची कमाई झाली होती.

4.माध्यमं आणि मंनोरजंन :

सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे डिजिटल, ऑनलाईन, गेमिंग, रेडिआ आणि ओव्हर द टॉप (ओटीटी) सारख्या घटकांना फायदा होणार आहे. तर दुसरीकडे मात्र टीव्ही,प्रिन्ट चित्रपट व मंनोरंजन, लाईव्ह कार्यक्रम आणि आउटडोर माध्यमांना मात्र नुकसान होण्याचा अंदाज आहे. चित्रपट क्षेत्राला तर महिन्याला 5 हजार 800 कोटी ते 7 हजार 800 कोटी रुपयाचा महसूलावर मोठय़ा प्रमाणात प्रभाव होण्याची शक्मयता आहे. विविध प्रकारच्या होणाऱया क्रिडा स्पर्धा रद्द करण्यात आल्यामुळे त्यामधून मिळणाऱया 45 टक्के जाहिरातीवर नकारात्मक परिणाम होणार आहे. 120 ते 150 कोटी रुपायची आयपीएल सामान्याची तिकीट विक्री रद्द करण्यात आल्याने मोठे नुकसान होणार आहे.

Related Stories

खनिज उत्पादन 7 टक्क्यांनी वाढले

Amit Kulkarni

मोबाइल बिलात होणार वाढ

Amit Kulkarni

5 महिन्यात 947 टक्क्मयांहून अधिक डाटा विक्री

Patil_p

शेअर बाजार सोमवारी घसरणीसह बंद

Omkar B

विमान प्रवाशांची संख्या निम्मी घटणार

Patil_p

व्याज सवलतीची मुदत वाढवली

Patil_p
error: Content is protected !!