Tarun Bharat

चिंताजनक : कोरोनाने होणाऱ्या मृत्यू दरात देशातील ‘हे’ राज्य अग्रस्थानी

Advertisements

ऑनलाईन टीम / लखनऊ : 


देशात कोरोनाची दुसरी लाट कमी होताना दिसत आहे. दैनंदिन रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. त्यातच पंजाबमधील स्थिती चिंताजनक आहे. कारण पंजाबमध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मृत्यू दराच्या बाबतीत पंजाब महाराष्ट्राच्या पुढे गेला असून मृत्यू दरात देशात पहिल्या नंबरवर येऊन पोहोचला आहे. 


मंगळवारी पंजाब मधील मृत्यू दर 2.7 टक्के तर महाराष्ट्रातील मृत्यू दर 2.0 टक्के इतका होता. तर देशात हाच दर 1.3 टक्के इतका आहे. त्यातच दिलासा देणारी बाब म्हणजे देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के इतका आहे. तर आता पर्यंत 5.7 लाख नागरिकांनी यावर मात केली आहे.


दरम्यान, प्रदेशात आता पर्यंत 1 कोटी पेक्षा अधिक नागरिकांचे नमुने घेण्यात आले आहे. यातील 5 लाख 97 हजार जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 1600 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तीन महिन्यांपूर्वी संसर्ग दर 13 टक्के इतका होता. आता हे प्रमाण 0.36 इतके आहे. 

  • मागील 24 तासात 115 नवे रुग्ण; 5 मृत्यू 


मागील 24 तासात पंजाबमध्ये कोरोनाचे 115 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 5 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आता पर्यंत 76 लाख 63 हजार 094 जणांनी लस टोचून घेतली आहे.  

Related Stories

TET परीक्षा घोटाळाप्रकरणी IAS खोडवेकर यांना अटक

datta jadhav

भारतात 24 तासात 354 नवे कोरोना रुग्ण

prashant_c

१६ राज्यसभेच्या जागांचा आज फैसला? महाराष्ट्रात ‘मआवि’त चलबिचल

Abhijeet Khandekar

रानमेवा खा, विस्मृती विसरा

Patil_p

ट्विटरवर कारवाईसाठी सरकार मोकळे

Patil_p

तिघे एकत्र लढलो तर भाजपला 50 जागाही मिळणे अशक्य

Omkar B
error: Content is protected !!