Tarun Bharat

चिंताजनक : नवी मुंबईतील एकाच शाळेत 16 विद्यार्थी पॉझिटिव्ह

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी मुंबई

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्ये शर्थीचे प्रयत्न करत आहेत. यातच नवी मुंबई येथील एका शाळेत तब्बल 16 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. ही कोरोनाची लागण घणसोलीमधील शेतकरी शिक्षण संस्था शाळेतील विद्यार्थ्यांना झाली आहे. यामुळे आता यांच्या सहवासात आलेल्या इतर विद्यार्थी आणि शिक्षकांची देखील कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या शाळेतील मुलांना कोरोनाची लागण झाल्याने मुलांच्या पालकांची चिंता वाढली आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने या शाळेचे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

जगभरातील अनेक देशामध्ये कोरोना कहर पाहायला मिळत आहे. तसेच भारतातील रुग्णसंख्येने ही तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7,145 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 289 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,77,158 लोकांना जीव लागला आहे.

याच पार्श्वभुमीवर देशात आता ओमिक्रॉनमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात 40, दिल्लीत 22, राजस्थानमध्ये 17, तेलंगणा 8, कर्नाटकमध्ये 8, गुजरात 7, केरळमध्ये 7 तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि चंदीगडमध्ये प्रत्येकी एक ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आला आहे.

Related Stories

उत्तराखंडमध्ये काँग्रेस नेत्यांमध्ये हमरातुमरी

Patil_p

…पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते : राहुल गांधींचा हल्लाबोल

Tousif Mujawar

कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील – विजय वडेट्टीवार

Archana Banage

पुणे विभागातील 5 लाख 53 हजार 771 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

सांगली : आरगेत जनता कर्फ्यु डावलून भरला आठवडी बाजार

Archana Banage

पालिकेच्या समोरची गळती काढण्याचे दोन दिवसांपासून काम सुरु

Patil_p
error: Content is protected !!