Tarun Bharat

चिंताजनक : पंजाबमधील कोरोना रुग्णांची संख्या 60 हजार पार

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पंजाबमध्ये मागील 24 तासात 1 हजार 498 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 60 हजार 013 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 

 
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एकूण 60,013 रुग्णांपैकी 42 हजार 543 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 1 हजार 739 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 11 लाख 44 हजार 008 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 15 हजार 731 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 501 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 80 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

Related Stories

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश

datta jadhav

युक्रेनमधील भारतीयांचं लवकरच एअरलिफ्ट

datta jadhav

नव्या बिहारसाठी नितीश यांची महत्त्वाची भूमिका

Patil_p

लोकजनशक्ती पक्षातील घडामोडीनंतर चिराग पासवान यांचे भावनिक ट्वीट

Archana Banage

पुलवामात दहशतवाद्याचा खात्मा; एकाचे आत्मसमर्पण

datta jadhav

विमान क्षेत्राला बसणार 21 हजार कोटींचा फटका

datta jadhav