Tarun Bharat

चिंताजनक! : पंजाबमध्ये 81 टक्के सॅम्पलमध्ये आढळला ब्रिटनचा स्ट्रेन

ऑनलाईन टीम / चंदिगढ : 

पंजाबमधून जीनोम सिक्वेन्ससाठी पाठविलेल्या 401 स्वॅब नमुन्यांपैकी 81 टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचा ब्रिटनमधील स्ट्रेन आढळून आला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. हा नवा स्ट्रेन तरुणांसाठी धोकादायक असल्याने पंतप्रधान नरेंद मोदी यांनी 60 वर्षाखालील व्यक्तेंना कोरोनाची लस अनिवार्य करावी, अशी मागणी त्यांनी मोदींकडे केली आहे. सिंह यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.  

पंजाबमधील 12 जिल्ह्यांमध्ये 75 मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. आतापर्यंत या राज्यात 56 लाख 26 हजार 458 स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 2 लाख 15 हजार 409 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. दरम्यान, सोमवारी येथे 2319 नवे बाधित रुग्ण आढळून आले. तर 58 जणांचा मृत्यू झाला.

Related Stories

देशमुखांची 4.20 कोटींची मालमत्ता जप्त

Patil_p

चिनी सैन्याची उत्तराखंडमध्ये घुसखोरी; पूल उध्वस्त

datta jadhav

झारखंड ः खाण दुर्घटनेत 25-30 जण अडकले

Patil_p

कोरोनापासून वाचण्यासाठी आदिवासींचा उपाय

Patil_p

व्हॉट्सअपला ग्रहण, सर्व्हर डाऊन!

mithun mane

मृत सैनिकांच्या नातेवाईकांची समजूत काढण्याचे चीनचे प्रयत्न

Patil_p