- मागील 24 तासात 47,827 नवे रुग्ण; 202 मृत्यू
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरी देखील रुग्ण संख्या काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. मागील 24 तासात राज्यात 47 हजार 827 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली. तर 202 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 29 लाख 04 हजार 076 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 55 हजार 379 एवढा आहे.


कालच्या एका दिवसात 24,126 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 24 लाख 57 हजार 494 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.62 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.9 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 3 लाख 89 हजार 832 रुग्ण उपचार घेत आहेत.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 2 कोटी 01 लाख 58 हजार 719 नमुन्यांपैकी 14.41 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 21 लाख 01 हजार 999 क्वारंटाईनमध्ये असून, 19 हजार 237 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- पुण्यात उच्चांकी वाढ


मागील 24 तासात पुण्यात तब्बल 4,653 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 39 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच 3,337 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण संख्या 2,78,099 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 2,35,597 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 37,126 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील 475 जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर आता पर्यंत 5,376 जणांनी आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत पुण्यात आजपासून मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आजपासून पुढील सात दिवस हा मिनी लॉकडाऊन असणार आहे. या सात दिवसात सर्व हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, शाळा, कॉलेजेस, पीएमपीएमएलची बससेवा इत्यादी गोष्टी पूर्णपणे बंद असतील.