Tarun Bharat

चिंताजनक : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6603 नवे कोरोना रुग्ण; 198 मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई  : 

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात बुधवारी एका दिवसात 6603 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 198 जणांचा मृत्य झाला. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2 लाख 23 हजार 724 इतकी झाली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 


बुधवारी नोंद झालेल्या 198 मृत्यूंपैकी 62 मृत्यू हे एकट्या मुंबईतील आहेत. सध्या राज्यात मृत्युदर 4.22 टक्के आहे. तर राज्यात एकूण 91 हजार 065 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 


आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 11 लाख 91 हजार 549 नमुन्यांपैकी 2 लाख 23 हजार 724 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 38 हजार 762 लोक होम क्वारंनटाइन मध्ये आहेत तर 47 हजार 072 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


त्यातच, दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी एकूण 4 हजार 634 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.06 टक्के एवढं आहे. राज्यभरात आतापर्यंत 1 लाख 23 हजार 192 लोकं कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

error: Content is protected !!