Tarun Bharat

चिंता नको, लागेल तेवढा निधी खर्च करा : राज्यमंत्री विश्वजित कदम

प्रतिनिधी / सांगली

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये महापालिका प्रशासनाने काम चांगले आहे. त्यामुळे चिंता नको, कोव्हीड नियंत्रणासाठी लागेल तेवढा निधी खर्च करा, अशा सूचना राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी महापालिका आयुक्त नितीन कडपडणीस यांना दिल्या. कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत राज्यमंत्री कदम यांनी महापालिकेत मॅरेथॉन बैठक घेतली. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, स्थायी समिती सभापती पांडूरंग कोरे, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीत कोरोना नियंत्रण, सुरू असलेल्या उपाययोजना, लसीकरण, अँटिजेंन, आरटीपीसीआर चाचण्या, मिरज येथील कोव्हीड सेंटर याबाबत सखोल आढावा ना. कदम यांनी घेतला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ना. कदम म्हणाले, कोव्हीड नियंत्रणासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा जीव तोडून काम करत आहे. मागील ४८ तासात तब्बल ५ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. हे प्रमाण देश आणि राज्याच्या तुलनेत अधिक आहे. मिरज येथे १२० खाटांचे अद्ययावत कोव्हीड सेंटर उभा करण्यात आले आहे. याचा चांगला फायदा रुग्णांना होईल.

महापालिकेने निधीची चिंता करू नये, लागेल तेवढा निधी महापालिकेच्या तिजोरीतून कोव्हीड उपाययोजनांसाठी खर्च करावा, अशा सूचना आयुक्तांना दिल्या आहेत, असे सांगत ना. कदम म्हणाले, राज्य शासनाकडूनही महापालिकेला निधी देऊ. रेमडेसीवर अंतिम उपाय नाही. राज्यातील परिस्तिथी केंद्र सरकारला चांगलीच ठाऊक आहे. त्यामुळे दुजाभाव न करता, केंद्राने माणुसकीच्या नात्याने राज्याला मदत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. दरम्यान भारती हॉस्पिटल सांगली व पुणे येथे उच्च क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट उभा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Related Stories

जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. निर्मला पाटील

Archana Banage

सांगली जिल्ह्यात बुधवारी लसीकरण नाही

Archana Banage

महापूराचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज- प्रांताधिकारी गणेश मरकड

Kalyani Amanagi

सांगली : इस्लामपुरातील खुनाचा सीसीटीव्ही फुटेजवरुन छडा

Archana Banage

सांगली : भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन ही लोकशाहीची गळचेपी – जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख

Archana Banage

देशिंग तलाठी व कोतवाल लाचलुचपतच्या जाळ्यात

Archana Banage