ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. देशाची राजधानी दिल्लीत तर चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत बुधवारी दिवसभरात 2033 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 48 जणांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 04 हजार 864 वर पोहचली आहे. यामधील 27 हजार 007 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी 3982 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 78 हजार 119 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 3213 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


सध्या दिल्लीत 23,452 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत 9461 आरटीपीसीआर टेस्ट आणि 12,567 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत जवळपास 7,01,859 टेस्ट करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सध्या दिल्लीत 458 कॅन्टोन्मेंट झोन आहेत.