Tarun Bharat

चिंता वाढली : बीएसएफच्या आणखी 30 जवानांना कोरोनाची लागण  

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसंदिवस वाढतच चालली आहे. शुक्रवारी हा आकडा 56 हजारच्या वर जाऊन पोहचला आहे. त्यातच आता दिल्लीतून एक धक्कादायक बातमी येत आहे. आज पुन्हा सीमा सुरक्षा बलच्या (बीएसएफ) 30 जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 223 जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, आज मिळालेल्या 30 जवानांपैकी 6 जवान हे दिल्लीतील आहेत तर अन्य 24 जण त्रिपुरा मधील आहेत. दिल्लीतील 6 जवानांपैकी  दोन जण हे हेेडक्वार्टरमध्ये तर अन्य चार जण बाकी ठिकाणी तैनात होते. या सर्व जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


याआधी गुरुवारी बीएसएफच्या दोन जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता तर 41 नवे रुग्ण आढळले होते. 


दरम्यान, जे जवान कोरोना रुग्णांच्या संपर्कात आले आहेत त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच कोरोना संदर्भात जारी करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन बीएसएफ द्वारे केले जात आहे. 

Related Stories

आमदार शोभारानी यांची भाजपकडून हकालपट्टी

Patil_p

‘ऑनलाईन बांधकाम’चे विघ्न संपेना; सॉफ्टवेअरमधील त्रुटी कायम

Abhijeet Khandekar

राज्यसभा निवडणुकीसाठी ED आणि CBI चा वापर होण्याची शक्यता? – संजय राऊत

Archana Banage

”बाबा रामदेव यांनी १५ दिवसांत माफी मागावी, नाहीतर १ हजार कोटींची भरपाई द्यावी”

Archana Banage

युक्रेनमधून 219 भारतीयांची घरवापसी

Patil_p

Sangli Breaking : गर्भवती मातेची दोन बालकासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Abhijeet Khandekar