Tarun Bharat

चिंता वाढली; ‘या’ राज्यात आढळला ‘ग्रीन फंगस’चा पहिला रुग्ण

Advertisements

ऑनलाईन टीम

कोरोना महामारीशी लढा देत असतानाच देशातील संकटे काही केल्या कमी होत नाहीत. चक्रीवादळे, रोज नव्या विषाणूचा धोका, म्युकरमायकोसीस, ब्लक, यल्लो फंगस यानंतर आता ग्रीन फंगसचं नव संकट देशासमोर उभं राहिल आहे. देशात ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. पंजाबमध्ये ग्रीन फंगसच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली आहे.

कोरोनामधून बरे झालेल्या एका व्यक्तीमध्ये ग्रीन फंगस आढळून आला आहे. जालंधर येथील रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत होता. तसंच रुग्णाच्या छातीतही वारंवार दुखत होते.

जालंधर जिल्हा सिव्हिल रुग्णालयाचे साथीचा रोग विशेषज्ञ, डॉ परमवीर सिंग यांच्या मते, ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण सापडला. यापूर्वी या रुग्णाला कोरोनाचीही लागण झाली होती. रुग्ण नुकताच कोरोनामुक्त झाला होता. सध्या त्याला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले असल्याचे सांगितले. मात्र रुग्णाची स्थिती स्थिर आहे का हे निश्चित सांगता येणार नसल्याचेही ते म्हणाले.

error: Content is protected !!