Tarun Bharat

‘चिकोडी’त आणखी तिघा शिक्षकांना कोरोना

Advertisements

बेळगाव जिल्हय़ात 27 शिक्षकांना बाधा : डीडीपीआय गजानन मन्नीकेरी यांची माहिती

प्रतिनिधी/ चिकोडी

राज्य सरकार व शिक्षण खात्याने कांही शाळांचे वर्ग व सहावी ते नववीपर्यंत विद्यागम शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत. त्यासाठी शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. त्या तपासणीत आता पुन्हा 3 शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिक्षक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव जिह्यातील कोरोनाबाधित शिक्षकांची संख्या 27 वर गेली असून चिकोडी जिह्यात ही संख्या 7 झाली आहे. हुक्केरी तालुक्मयातील कोनकेरी शाळेतील प्राथमिक शिक्षिकेला, गोकाक तालुक्मयातील कनकगिरी सरकारी शाळेतील शिक्षक व हिरेनंदी येथील सरकारी माध्यमिक शाळेतील शिक्षकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी गजानन मन्नीकेरी यांनी दिली.

शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी शिक्षकांची तपासणी करण्यात येत आहे पण विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी करण्यात येत नसल्यामुळे सामूहिक संसर्गाचा धोका वाढला असल्याचा पाठपुरावा तरुण भारतकडून सातत्याने करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपूर्वीच 4 शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. आता आणखीन तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे विद्यागम व वर्ग सुरू करणे धोक्मयाचे असल्याचे दिसून येत आहे. सरकार व शिक्षण खात्याने शाळा व विद्यागम योजना सुरू करण्यापूर्वी संबंधित सर्व शिक्षक व संबंधित विद्यार्थी यांची कोरोना तपासणी करूनच हा उपक्रम राबवणे योग्य ठरले असते. तरीही पालकांना संसर्ग झाला असल्यास मुलांकरवी शाळेत किंवा विद्यार्थ्यांच्या प्रवाहातही हा संसर्ग येण्याची नाकारता येत नाही.

चिकोडी शैक्षणिक जिह्यातील बहुतांशी शिक्षकांची तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित शिक्षकांची पंधरा दिवसात तपासणी पूर्ण होण्याची शक्मयता आहे. पण शिक्षक सुरक्षित असले तरी शाळेत व विद्यागममध्ये सहभागी होणारे विद्यार्थी कोरोनामुक्त असल्याचा दाखला मात्र मिळू शकत नाही. यामुळे शिक्षकांना अध्यापन करताना याचा धोका कायम आहे.

गोकाक तालुक्यातील दोघा शिक्षकांना कोरोनाची बाधा

घटप्रभा : गोकाक तालुक्यातील कनकगिरी व हिरेनंदी येथील सरकारी शाळेतील दोघा शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या या दोन्ही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेने अद्याप कोरोनाचा संसर्ग कमी झाला नसल्याचे स्पष्ट झाल्याने भीतीचे वातावरण आहे. या दोन्ही शिक्षकांना कोविड काळजी केंद्रामध्ये पाठविण्यात आले आहे. घटनेनंतर दोन्ही गावच्या ग्राम पंचायतीच्यावतीने शाळा आवारात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली असून, शाळा तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा आदेश डीडीपीआय गजानन मण्णिकेरी यांनी दिला आहे. मध्यंतरी चाचणी घटल्याने कोरोना गेल्याचे काहींना वाटत होते. मात्र कोरोना अद्याप गेला नसल्याचे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

Related Stories

बागलकोट जिल्हय़ात 20 कोरोनाबाधित

Patil_p

अनगोळ येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

sachin_m

नाल्यांचे बांधकाम करण्याची मागणी

Patil_p

पोलीस असल्याचे भासवून वृद्ध दाम्पत्याची लूट

Amit Kulkarni

मणगुत्ती क्रॉसजवळ बेकायदा तांदूळ जप्त

Omkar B

माळी गल्लीत शिवराज्याभिषेक दिन

Amit Kulkarni
error: Content is protected !!