Tarun Bharat

चिकोडी येथे बंदला संमिश्र प्रतिसाद

शेतकरी विरोधी कायद्यांचा निषेध : दीड तास रास्तारोको

वार्ताहर/ चिकोडी

भू-सुधारणा, वीजपुरवठा खासगीकरण, एपीएमसी सुधारणा कायद्याच्या विरोधात सोमवारी कर्नाटक बंदची हाक विविध संघटनांकडून देण्यात आली होती. त्यानुसार चिकोडीत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

कर्नाटक राज्य रयत संघ, हसिरु सेना, कर्नाटक रक्षण वेदिका, दलित संघर्ष समिती आदींकडून चिकोडी-अंकली रस्त्यावरील बी. के. महाविद्यालयापासून बसव सर्कलपर्यंत मोर्चा काढून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून या कायद्यांचा निषेध केला. बसवसर्कल येथे मानवी साखळी करून काहीकाळ रास्तारोको करण्यात आला. शेतकऱयांसाठी घातक असलेल्या या कायद्यातील तरतुदी काढून टाकण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांकरवी मुख्यमंत्र्यांना पाठवून देण्यात आले.

यावेळी काँग्रेस नेते महावीर मोहिते, संजू बडीगेर, अशोक पाटील, नागेश माळी, चंद्रकांत हुक्केरी, सुनील माळी, मल्लिकार्जुन मंगाज, चन्नाप्पा बडीगेर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे दीड तास रास्तारोको करण्यात आल्याने सर्वच मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Related Stories

ग्रामीण भागातील बससेवा सुरू करा

Omkar B

कॅम्प येथे घरावर झाड कोसळून नुकसान

Tousif Mujawar

भाजीपाल्यांची आवक वाढल्याने दर उतरले

Patil_p

घरावरील होर्डिंगना शुल्क आकारण्याची आयुक्तांची सूचना

Omkar B

निग्यानट्टी येथे बेकायदा दारू जप्त

Omkar B

योगेश पाटीलला सुवर्णपदक

Amit Kulkarni