Tarun Bharat

चिकोडी रोड-रायबाग दुपदरीकरणाचे काम पूर्ण

रेल्वेमार्ग झाला कार्यान्वित : रेल्वे प्रवासी गती वाढणार

प्रतिनिधी/ बेळगाव

लोंढा ते मिरज या मार्गाच्या दुपदरीकरणातील महत्त्वाचा टप्पा असणारा चिकोडी रोड ते रायबाग या 13 कि.मी. रेल्वेमार्ग दुपरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. 16 डिसेंबरपासून हा दुहेरी रेल्वेमार्ग कार्यान्वित करण्यात आला आहे. लोंढा ते मिरज 186 कि.मी. दुपदरीकरणातील पूर्ण झालेला हा दुसरा टप्पा आहे. यामुळे रेल्वे प्रवासाची गती वाढणार आहे.

सन 2015-16 मध्ये पुणे ते लोंढा या रेल्वेमार्ग दुपदरीकरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. एकूण 1 हजार 191 कोटी रुपये त्यासाठी मंजूर करण्यात आले होते. गतवषी घटप्रभा ते चिकोडी रोड या 16 कि.मी. मार्गाचा कार्यारंभ करण्यात आला होता. रायबाग ते कुडची दरम्यानच्या मार्गाचे काम 2021 अखेर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तत्कालिन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी बेंगळूर ते मुंबई या शहरांमध्ये सर्वोत्तम रेल्वे सुविधेसाठी हा प्रकल्प हाती घेतला होता.

चिकोडी रोड ते रायबाग यादरम्यान 21 लहान ब्रिज, 4 रोड अंडरब्रिज तर एका कॅनेल ब्रिजचा समावेश आहे. रायबाग येथे अत्याधुनिक असे रेल्वेस्थानक करण्यात आले आहे. यामध्ये पुरुषांसाठी वेटींग हॉल, महिलांसाठी वेटींग हॉल, वातानुकूलित एसी हॉल, नवीन दोन प्लॅटफॉर्म, एक फूट ओव्हरब्रिज यासह इतर सेवांचा समावेश आहे. चिकोडी रोड स्थानकामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंटरलॉकिंग व्यवस्था करण्यात आली आहे.

रेल्वेमार्ग झाला कार्यान्वित

चिकोडी रोड ते रायबाग यादरम्यानच्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले असून आता हा मार्ग कार्यान्वित करण्यात आला आहे. मिरज ते लोंढादरम्यान या रेल्वेमार्गातील हा कार्यान्वित होणारा हा दुसरा टप्पा होता. त्यामुळे पुढील काळात मुंबई ते बेंगळूर या मार्गावर वेगाने प्रवास करता येणार आहे.

Related Stories

सोलापुरात 25 अज्ञात व्यक्तींची दहशत

Patil_p

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या पतीचा मृत्यू

Amit Kulkarni

शाळा परिसर पुन्हा गजबजले

Amit Kulkarni

तालुक्यात भंडाराच्या उधळणीत यल्लम्मा देवीचा जागर

Amit Kulkarni

समान नागरी कायद्याचा हक्क मिळंल..!

Amit Kulkarni

केआर शेट्टी टी-20 क्रिकेट स्पर्धेचे विश्रुत स्ट्रायकर्स तिसरे प्रँचायझी

Amit Kulkarni