Tarun Bharat

चितळी येथील अपहरणासहा दरोडय़ाचा गुन्हा उघडकीस

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

चितळी (ता.खटाव) येथील अपहरणासह दरोडय़ाचा गुन्हा उघड करून मुख्य सूत्रधारासह 9 संशयितांना जेरबंद करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. किरण गुलाब गावीत (वय 32 वर्षे, रा.विद्यानगर कराड), बिरजू उर्फ सतिश विलास रजपूत उर्फ कांबळे (वय 38 वर्षे, रा.शांतीनगर, इचलकरंजी), विशाल उर्फ सागर हरीभाऊ ननावरे उर्फ गुरव (वय 29 वर्षे, रा.सोमंथळी ता. फलटण), दुशांत मनोहर पांढरपट्टे, वय 31 वर्षे (रा. निपाणी जि. बेळगाव), अभिजीत सुरेश खंडागळे (वय 35 वर्षे, रा.राधानगरी,जि.कोल्हापूर सध्या रा. निपाणी), प्रविण बाळासो शेवाळे (वय 26 वर्षे, रा. घोगाव, ता. कराड), बाळू तुकाराम भोसले (वय 31 वर्षे, रा.दुर्गामाता चौक, इचलकरंजी), किशोर अंबादास निलंगे (वय 27 वर्षे, रा. शहापूर, पाटील मळा, इचलकरंजी), विशाल आनंदा शेवाळे (वय 30 वर्षे, रा.मलकापूर, ता. कराड) अशी त्यांची नावे आहेत.

 सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस अधीक्षक अजय बन्सल म्हणाले, 19 डिसेंबर 2021 रोजी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास चितळीश (ता.खटाव) गावच्या हद्दीत पंढरपूर-मल्हारपेठ जाणाऱया मार्गावर मोहिते मळा येथे फिर्यादी ऋषिकेश राजेंद्र शेटे (रा. उंब्रज, ता. कराड हे झरे, ता. आटपाडी) येथून उंब्रजकडे जात असताना त्यांच्या एस. क्रॉस गाडीला दुचाकीने पाठीमागून धडक देऊन त्यांची गाडी थांबवली. दुचाकीवरील दोघे व अन्य दोघांनी त्यांचे व त्यांच्या मित्राचे अपहरण करून शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करत त्यांच्याकडून 95 हजार रुपये किमतीचा मोबाइल, टॅब व घडय़ाळ असा मुद्देमाल चोरून नेला. त्या दोघांनाही हात पाय बांधलेल्या अवस्थेत पुसेसावळी जवळील एका शेतात सोडून संशयित निघून गेले. याबाबतची तक्रार वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

 सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली पथक स्थापन करून पथकाने फिर्यादी तसेच साक्षीदार यांच्याकडे विचारपूस केली असता फिर्यादीचे अपहरण करून त्यांचा मोबाइल टॅब काढून घेऊन त्याचे सर्व पासवर्ड माहीत करून ते अनलॉक करून घेतले होते. त्यामुळे फिर्यादीने घरी आल्यानंतर लगेच त्याचे व्हॅलेंटचा युजर आयडी, पासवर्ड राखून पाहिले असता त्याच्या क्रिप्टोकरन्सीचा 80 हजार डॉलर म्हणजे 64 लाख रुपये खंड दुसऱया व्हॅलेंटला ट्रान्सफर झाल्याचे दिसले.

 फिर्यादी ऋषिकेश शेटे हे मागील काही वर्षापासून ट्रेडिंगचा व्यवसाय करत असून घडलेल्या घटनेवरून संशयितापैकी त्यांच्या ट्रेडिंगच्या व्यवसायाशी संबंधित असावा, अशी शंका पथकाला आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे फिर्यादी याच्या ओळखीच्या व्यक्तींसह फलटण, कराड, इचलकरंजी, निपाणी येथील 9 संशयितांनी हा गुन्हा केला असल्याचे उघड झाले. संबंधितांना जेरबंद करण्यात यश आले असून त्यांच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती अजय बन्सल यांनी यावेळी दिली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, विश्वनाथ सपकाळ, सतीश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष पवार, संतोष सपकाळ, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, अर्जुन शिरतोडे, निलेश काटकर, गणेश कापरे, स्वप्निल माने, विक्रम पिसाळ, मोहन पवार आदींनी सहभाग घेतला.

Related Stories

सातारा : बाळासाहेब ढेकणे यांचा स्विकृत नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज

datta jadhav

एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोहिमेचा कराडला प्रारंभ

Patil_p

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची सुमो चोरीला

datta jadhav

दह्याट येथे जमीन कसण्यास आडकाठी केल्याने दोघांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

Abhijeet Shinde

सातारा : कराडात भूमापक अधीक्षकांसह सहाय्यक लाच घेताना जाळ्यात

Abhijeet Shinde

सातारा : कुसुम्बी ग्रामपंचायतीने लग्न समारंभावर केली कारवाई

Abhijeet Shinde
error: Content is protected !!