Tarun Bharat

चित्रदुर्गमध्ये अपघातात बेळगावचे तिघे ठार

Advertisements

गुईलाळू टोलनाक्मयावर टँकरला कारची मागून धडक : बेळगावहून बेंगळूरला जात असताना घडली दुर्घटना, कारचा चक्काचूर

प्रतिनिधी / बेळगाव

हिरीयूर, जि. चित्रदुर्ग टोलनाक्मयाजवळ भरधाव कारने टँकरला पाठीमागून ठोकरल्याने झालेल्या भीषण अपघातात बेळगाव येथील एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले. गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गुईलाळू टोलनाक्मयाजवळ ही घटना घडली आहे.

रमेश श्रीनिवास शानभाग (वय 65), सीमा शानभाग (वय 61), विश्वनाथ शानभाग (वय 68) तिघेही राहणार सुभाषनगर-बेळगाव अशी मयतांची नावे आहेत. टोलनाक्मयावर टोल भरून पुढे चाललेल्या टँकरला केए 22 पी 0362 क्रमांकाच्या कारची पाठीमागून जोराची धडक बसून हा अपघात घडला आहे. एwमंगल पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.

रमेश शानभाग, त्यांची पत्नी सीमा व भाऊ विश्वनाथ हे तिघे जण कारमधून बेळगावहून बेंगळूरला जात होते. उपलब्ध माहितीनुसार हे कुटुंबीय मूळचे भांदूर गल्ली, बेळगाव येथील राहणारे होते. सध्या सुभाषनगर परिसरात त्यांचे वास्तव्य होते. अपघातानंतर कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. कारमध्ये आढळलेल्या मतदार ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटविण्यात आली.

एwमंगल पोलिसांनी बेळगाव पोलिसांशी संपर्क साधला. मतदार ओळखपत्रावरून बेळगाव येथील त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना माहिती देण्यात आली. बेळगाव येथील नातेवाईक दाखल झाल्यानंतर रात्री तिन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. पोलीस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश हे कार चालवत होते.

गुईलाळू टोलनाक्मयावरील भीषण अपघातात बेळगाव येथील तिघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती बेळगाव परिसरात समजताच हे तिघे कुठले आहेत, याविषयी शोध सुरू झाला.

अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीत कैद

अखेर बेळगाव पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना माहिती दिली. अपघाताची दृश्ये टोलनाक्मयावरील सीसीटीव्हीत कैद झाल्याचे एwमंगल पोलिसांनी सांगितले आहे.

Related Stories

हेस्कॉम वळतेय खासगीकरणाकडे

Patil_p

मराठीत परिपत्रके-फलकांसाठी मध्यवर्ती म. ए. समितीचे निवेदन

Amit Kulkarni

नानावाडी रहिवाशांना पूरस्थितीचा धोका कायम

Patil_p

यंत्रामुळे शेतीत सुलभता मात्र खर्च वारेमाप

Patil_p

बंदच्या पार्श्वभूमिवर शेतकऱयांची बैठक

Patil_p

हारुगेरी पोलिसांकडून चोरटय़ांना अटक

Amit Kulkarni
error: Content is protected !!