Tarun Bharat

चित्रपटगृह चालकांचे कोटींचे नुकसान

-22 पासून 50 टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरू -कोरोना काळात चित्रपटगृहे बंदचा फटका

अहिल्या परकाळे/कोल्हापूर

कोरोनापुर्वी शहरात एकपडदा सात तर मल्टिप्लेक्स तीन चित्रपटगृहे सुरू होती. त्यानंतर कोरोना संसर्गामुळे ती सुमारे पावणेदोन वर्षापासून बंद आहेत. या काळात चित्रपटगृह चालकांना कोटÎावधींचे नुकसान सहन करावे लागले. तरीही नोकर पगार, लाईट भाडे व अन्य खर्चामुळे चित्रपगृह चालक मेटाकुटीस आले होते. मात्र शुक्रवारी 22 ऑक्टोंबरपासून चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

कोल्हापुरात यापुर्वी अकरा चित्रपटगृहे सुरू होती. त्यातील चार चित्रपटगृहे दुरूस्तीच्या कारणास्तव बंद आहेत. सात चित्रपटगृहे व तीन मल्टीप्लेक्स दिवाळीच्या तोंडावर सुरू होणार आहेत. मात्र 50 टक्के क्षमतेवर चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे चित्रपटगृहचालकांसह प्रेक्षकांत आनंदाचे वातावरण आहे. गतवर्षीपासून चित्रिकरणास परवानगी नसल्याने बहुतांश चित्रपटांची निर्मिती थंडावली होती. त्यामुळे नवीन कोणता चित्रपट प्रदर्शित करायचा, याबद्दल संभ्रमावस्था आहे. 50 टक्के ऐवजी 100 टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी पुढे येत आहे.

ओटीटीवर नवीन चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे ओटीटी व यू टÎूबवर  घरबसल्या चित्रपट पहावयास मिळत आहे. त्यातून प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळेल का, याबद्दल चित्रपटगृह चालकात साशंकता आहे. ओटीटी आणि भविष्यात मोबाईलवर चित्रपट प्रदर्शित होतील, त्याचे आव्हान हे चित्रपटगृहांसमोर आहे. परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून चित्रित केलेले चित्रपट मोठÎा पडद्यावरच व्यवस्थित पाहता येतील. त्यामुळे कितीही टेक्नॉलॉजी आली तरी चित्रपटगृहातील मोठÎा पडद्याचे महत्व अबाधीत राहणार आहे, असेही चर्चा आहे.  सध्या नोकरांचा पगार, वीजबील, घरफाळा यासह अन्य खर्चाचा बोजा असल्याने चित्रपटगृह चालकांना कोटÎावधीचा आर्थिक तोटा बसत आहे. त्यामुळे अन्य व्यवसायाप्रमाणेच चित्रपटगृह मालकांनाही मदत करावी, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

प्रेक्षकांच्या सवयीत बदल

दहा वर्षापासून संकटात सापडलेल्या चित्रपटगृह व्यवसायाला सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. त्यात कोरोनामुळे आर्थिक आघात झाला आहे. तरीही गुरूवारपासून नेटाने उभे राहून चित्रपटगृह सुरू होतील. परंतु कोरोना काळात बंद असलेल्या चित्रपटगृहांमुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या सवयीत बदल झाला आहे. त्यामुळे प्रेक्षक येतील का, माहिती नाही, परंतु चित्रपटगृहे सुरू होतील. 

 सूर्यकांत पटीलबुदीहाळकर (अध्यक्ष, कोल्हापूर सिनेमा एक्झिब्युटर असोसिएशन)

चित्रपटगृहांवर अवलंबून व्यावसायिकांचेही नुकसान

चित्रपटगृहांवर चित्रपट निर्मिती, वितरण, प्रसिद्धी व सेवा या प्रमुख घटकातील व्यवसाय अवलंबून असतात. या सर्वच व्यवसायिकांना कोरोनात नुकसान सहन करावे लागले, त्यामुळे चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर या व्यवसायांनाही चालना मिळेल, अशी आशा आहे.

Related Stories

Kolhapur : सांगरूळच्या राणी मगदूम यांच्या निधनानंतर अवयव दान

Abhijeet Khandekar

शिक्षकानेच दाखवले शाळकरी मुलींना अश्लील व्हिडीओ,राधानगरीतील धक्कादायक प्रकार

Archana Banage

कोल्हापूर : बहिरेश्वर येथे कुंभी नदी पात्रात मगरीचे दर्शन

Archana Banage

पेठवडगाव बाजार समितीच्या मतमोजणीत समझोता एक्सप्रेस विजयाकडे घोडदौड

Abhijeet Khandekar

”ही तर `ठाकरे सरकारची पळपुटेपणाची परंपराच”

Archana Banage

संतापजनक: कोल्हापुरात पोलिसांनी मंत्र्यासाठी वाहनधारकावर उगारला हात

Archana Banage